नवी दिल्ली : ग्रेट इंडियन फेस्टिव्हल ३ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या सेलमध्ये स्मार्टफोनसह वेगवेगळ्या प्रोडक्ट्सवर बंपर डिस्काउंट मिळेल. आणि स्मार्टफोनवर देखील ऑफरचा लाभ मिळणार आहे. वनप्लस ९ सीरिजचे हे फ्लॅगशिप स्मार्टफोन यावर्षी मार्चमध्ये लाँच झाले आहेत. वाचाः वनप्लस ९ प्रो स्मार्टफोन ५० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे. फोनला ६४,९९९ रुपयात लाँच करण्यात आले होते. म्हणजेच, तब्बल १५ हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल. तर वनप्लस ९ ला जवळपास १० हजार रुपये डिस्काउंटनंतर ४० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध केले जाईल. अॅमेझॉनने अद्याप दोन्ही फोन्सवरील अचूक ऑफर्सची माहिती दिलेली नाही. मात्र, डिस्काउंट्स टीझरवरुन कंपनी फोनला कमी किंमतीत उपलब्ध करण्याचे संकेत मिळतात. वनप्लस ९ प्रो स्मार्टफोन ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅम +२५६ जीबी स्टोरेज मॉडेलमध्ये येतो. याची किंमत ६९,९९९ रुपये आहे. वनप्लस ९ देखील ८ जीबी आणि १२ जीबी रॅम मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत ५४,९९९ रुपये आहे. सीरिजच्या फीचर्सबद्दल सांगायचे तर फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ वर काम करतो. दोन्ही फोन्सचा डिस्प्ले १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. यात Warp चार्ज ६५टी फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. वनप्लस ९ प्रो ५० वॉट वायरलेस चार्जिंग सपोर्ट करतो. वनप्लस ९ मध्ये ६.५५ इंचाचा एमोलेड डिस्प्ले आहे. तर ९ प्रो मध्ये मोठा ६.७ इंचाचा एमोलेड डिस्प्ले आहे. मध्ये Sony IMX७८९ सेंसर ४८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. याशिवाय Sony IMX७६६ सेंसरसह ८ मेगापिक्सल टेलिफोटो सेंसर आणि २ मेगापिक्सल मोनोक्रोम सेंसर ५० मेगापिक्सल कॅमेरा आहे. दुसरीकडे मध्ये Sony IMX६८९ सेंसरसह ४८ मेगापिक्सल कॅमेरा, ५० मेगापिक्सल Sony IMX७६६ आणि २ मेगापिक्सल मोनोक्रोम सेंसर दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3A0Ox8A
Comments
Post a Comment