नवी दिल्ली : आपल्या स्मार्टफोनमध्ये प्रत्येक कामासाठी एक वेगळे अॅप उपलब्ध असते. मात्र, एवढ्या अॅप्ससाठी फोनमध्ये जास्त स्पेस देखील असणे गरजेचे असते. मात्र, वेगवेगळे अॅप्स डाउनलोड करण्याऐवजी एकाच अॅप्समध्ये अनेक कामे होत असतील तर ? तुम्ही आधार कार्ड, पॅनसह डझनभर सरकारी योजनांचा लाभ Umang या एका अॅपद्वारे घेऊ शकता. यामुळे तुम्हाला , व अन्य सरकारी कामांसाठी वेगवेगळ्या वेबसाइटवर जाण्याची गरज पडणार नाही. Umang अॅपवर मिळणाऱ्या सरकारी सेवा
- आधार कार्ड
- पॅन सेवा
- डिजिलॉकर
- आयुष्मान भारत योजना
- PF Balance चेक
- NPS ची माहिती
- पाणी आणि वीज बिलिंग सेवा
- भारत गॅस सेवा
- M-KISAN सेवा
- CBSE
- AICTE
- AKPS
- इनकम टॅक्स
- यासाठी सर्वात प्रथम अथवा वरून उमंग अॅप डाउनलोड करा.
- आता अॅप ओपन केल्यावर रजिस्टर करण्यासाठी काही माहिती द्यावी लागेल.
- यासाठी तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर व्हेरिफाय करावा लागेल. नंबर टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल तो व्हेरिफाय करा.
- आता तुम्हाला m-PIN सेट करायचा आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.
- यानंतर Umang अॅप ओपन करून, तुम्हाला आवश्यक असलेल्या सेवा शॉर्टलिस्ट करू शकता.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3EXjGxg
Comments
Post a Comment