१ ऑक्टोबरपासून बंद होऊ शकते तुमचे ओटीटी सबस्क्रिप्शन, ‘या’ नियमात झाला बदल

नवी दिल्ली : म्हणजेच आरबीआयचे () नियम १ ऑक्टोबरपासून लागू होतील. या नियमांमुळे यूटिलिटी बिल्ट, ओटीटी सबस्क्रिप्शन आणि सर्व्हिस पेमेंट्ससाठी आपोआप पैसे आकारले जाणार नाहीत. वाचा: AFA रूल्स डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, प्रीपेड कार्ड्सच्या ऑटो पेमेंटवर लागू असतील. नवीन नियमांनुसार, ५००० रुपयांपेक्षा कमी रक्कमेवर ऑटो डेबिट लागू असेल. नवीन नियमांनुसार, ऑटो डेबिट पेमेंटला ग्राहकांच्या परवानगीनंतरच लागू केले जाईल. बँकांना पेमेंटच्या २४ तास नॉटिफिकेशन पाठवावे लागेल. ग्राहक पेमेंटला बदलू शकतात अथवा रद्द करू शकतात. ५ हजार रुपयांपेक्षा अधिकच्या पेमेंटसाठी ओटीपी देणे गरजेचे आहे. या नियमांना बँकिंग फ्रॉड आणि ग्राहकांच्या सुरक्षेसाठी लागू केले जाईल. या नियमांचा ओटीटी सबस्क्रिप्शन, यूटिलिटी बिल पेमेंट, न्यूज वेबसाइट सबस्क्रिप्शनवर परिणाम होईल. बँक अकाउंट्सशी लिंक पेमेंट्सवर परिणाम होणार नाही. यामुळे होम लोन, ऑटो लोन, ईएमआय, एसपीआय आणि विम्याच्या हप्त्यांवर परिणाम होणार नाही. दरम्यान, याआधी हे नियम १ एप्रिलपासून लागू होणार होते. मात्र याची मुदत ६ महिने वाढवण्यात आली होती. आता हे नियम १ ऑक्टोबरपासून लागू होतील. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CTPVve

Comments

clue frame