ब्रेकफास्टने होते सुंदर पिचाईंच्या दिवसाची सुरुवात, ऑफिसमध्ये करायला आवडते ‘ही’ गोष्ट; पाहा त्यांचे डेली रुटीन

नवी दिल्ली : चे नेतृत्व सध्या यांच्या हाती आहे. गुगलसोबतच ते चे देखील देखील सीईओ आहेत. पिचाई यांनी आपला ब्रेकफास्ट रुटीन शेअर केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की ब्रेकफास्टमुळेच त्यांना दिवसाची सुरुवात करताना एनर्जी मिळते. ब्रेकफास्टला दिवसातील सर्वात महत्त्वाचा आहार मानले जाते. अनेक तज्ञांनी देखील यापूर्वी याबाबत मत मांडले आहे. याबाबत सातत्याने सुचना देखील केल्या जातात. वाचा: पिचाई यांच्याकडे आणि अल्फाबेटची जबाबदारी आहे. त्यांचे म्हणणे आहे की, दिवसाची सुरुवात चांगली झाल्यास संपूर्ण दिवस आनंदात जातो. पिचाई यांच्यानुसार, ते मॉर्निंग पर्सन नाही. मात्र, त्यांचा नाश्ता सकाळी ६:३० ते ७:०० या कालावधीत होतो. त्यांच्या दिवसाची सुरुवात The Wall Street Journal या वृत्तपत्राची हार्ड कॉपी आणि The New York Times चे डिजिटल एडिशन वाचून होते. यासोबतच, ते नाश्ता करत असतात. यावेळी ते टोस्ट, अंड्यासोबत चहा पितात. अंडी खासकरून ते ऑमलेट करून खातात. सुंदर पिचाई यांची ड्रेसिंग स्टाइल देखील साधी आहे. ते वर्कप्लेस आणि ऑफिसमध्ये कॅज्यूअल कपड्यात दिसतात. त्यांना चालायला देखील आवडते. त्यामुळे ते ऑफिसमध्ये देखील अनेकदा चालताना दिसतात. त्यांचे म्हणणे आहे की, चालताना अधिक चांगला विचार करता येतो. यामुळे त्यांना चालताना मिटिंग करायला आवडतं. ते शाकाहारी असल्याने त्यांचे जेवण देखील साधेच असते. लंचमध्ये असे काही खास पदार्थ नसतात. मीटिंगमुळे दुपारी जेवणासाठी वेळ न मिळाल्यास ते टोस्ट खासतात. संध्याकाळी ते आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतात. कधीकधी जिमला देखील जातात. त्यांचे म्हणणे आहे की, सर्वांनीच आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे व शारीरिक हालचाल करावी. मोकळ्या वेळेत त्यांना पुस्तक वाचायला आवडते. फ्री टाइम असल्यावर ते घरी जातात. ऑफिसचे काम ते कधीच घरी नेत नाही. त्यांच्या घरी २० ते ३० फोन्स आहेत, ज्याचा वापर ते टेस्टिंगसाठी करतात. घरी त्यांना क्रिकेट आणि फुटबॉल पाहायला आवडते. तसेच, रात्रीच्या जेवणानंतर मुलं झोपल्यावर ते झोपतात. दरम्यान, सुंदर पिचाई यांचा जन्म भारतात झाला असून, त्यांननी स्टँडफोर्ड यूनिव्हर्सिटीमधून शिक्षण पूर्ण केले आहे. ते गुगल आणि अल्फाबेटसाठी अनेक वर्षांपासून काम करत आहे. दरम्यान, गुगलच्या ब्लॉक पोस्टनुसार पिचाई हे कंपनीसाठी नवीन टेक्नोलॉजी तयार करण्यावर काम करत आहेत. यात खासकरून आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा समावेश असेल. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39Jl2xf

Comments

clue frame