म्हणून या फेस्टिवल सीजनमध्ये नवा 5G स्मार्टफोन खरेदी करणे टाळावे, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्ली: आणि वर फेस्टिव्हल सीझन सेलची घोषणा करण्यात आली आहे. या सेल दरम्यान, अनेक उत्तम उपकरणे विक्रीसाठी उपलब्ध केली जात असून काही नवीन स्मार्टफोन देखील या दरम्यान लाँच करण्यात येणार आहे. सणासुदीच्या या काळात 5G स्मार्टफोनला खूप मागणी असेल असेही सांगण्यात येत आहे. पण, यावर्षी 5G स्मार्टफोन खरेदी करणे खूप लवकर होईल असेही म्हटले जात आहे. यामागे नेमके कारण काय ते जाणून घेऊया सविस्तर. वाचा: 5G नाही तर फीचर्सकडे द्या अधिक लक्ष : तज्ञांच्या मते, भारतीय ग्राहकांनी 5G स्मार्टफोनसाठी अतिरिक्त पैसे खर्च करू नयेत. कारण, भारतात 5G रोलआउट पूर्णतः स्थापित होण्यासाठी सुमारे एक ते दोन वर्षे लागू शकतात. या काळात 4G नेटवर्कमध्येही सुधारणा होण्याची शक्यता आहे. म्हणूनच ग्राहकांनी चांगला 4G स्मार्टफोन खरेदी करण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. तज्ञांच्या मते, स्मार्टफोनची सरासरी लाईफ ११ महिने असते. अशा स्थितीत नवीन 5G स्मार्टफोनसाठी पुढच्या वर्षीची वाट पाहावी. या गोष्टी लक्षात ठेवा: सध्या स्मार्टफोन निर्मात्या कंपन्या परवडणाऱ्या किमतीत 5G स्मार्टफोनचे आमिष युजर्सना दाखवत आहेत. पण, या स्वस्त स्मार्टफोनमध्ये खूप कमी 5G बँड आहेत. हे स्मार्टफोन भविष्यासाठी तयार नाहीत. त्यामुळे स्वस्त 5G स्मार्टफोन टाळलेलेच बरे . IPhone 12 आणि iPhone 13 Series सह इतर काही स्मार्टफोनमध्ये mmWave रेडिओ फ्रिक्वेन्सीसह 5G कनेक्टिव्हिटी दिली जात आहे. या तंत्रज्ञानात खूप वेगवान 5G स्पीड उपलब्ध आहे. परंतु, एमएमवेव्ह रेडिओ फ्रिक्वेन्सीवर आधारित स्मार्टफोन खूप महाग आहेत. अशा परिस्थितीत, हे 5G स्मार्टफोन खरेदी करणे फायदेशीर ठरणार नाही. तसेच, mmWave फ्रिक्वेन्सी भारतात उपलब्ध होईल की नाही याबाबत संभ्रम आहे. 5G कनेक्टिव्हिटीसह स्मार्टफोनमध्ये डेटा रिसीविंगमध्ये अधिक बॅटरी वापरली जाते . अशा परिस्थितीत, मोठ्या बॅटरीसह 5G स्मार्टफोन खरेदी करणे हा एक चांगला पर्याय असेल. म्हणूनच, जर तुम्ही 5G स्मार्टफोन विकत घेत असाल तर मोठी आणि मजबूत बॅटरी असलेल्या स्मार्टफोनला प्राधान्य द्या. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zHVhbf

Comments

clue frame