सॅमसंगचा सर्वात 'स्लिम' 5G स्मार्टफोन Galaxy M52 5G लाँच, फोनमधील फीचर्स शानदार, पाहा किंमत-ऑफर्स

नवी दिल्ली: सॅमसंगने Samsung M52 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला असून Samsung Galaxy M52 M52 5G स्मार्टफोन ७.४ सुपर स्लिम बॉडीमध्ये येतो. या स्मार्टफोनमध्ये ६ जीबी रॅम १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज पर्याय उपलब्ध आहे. फोनमध्ये 5G कनेक्टिव्हिटीसाठी ११ 5G बँड देण्यात आले असून हा फोन ब्लेझिंग ब्लॅक आणि आयसी ब्लू कलर ऑप्शनमध्ये येतो. पाहा डिटेल्स. वाचा: :किंमत आणि ऑफर Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोनच्या ६GB + १२८ GB व्हेरिएंटची किंमत २९,९९९ रुपये आहे. तर ८GB + १२८ GB वेरिएंट ३१,९९९ रुपयांमध्ये येईल. अॅमेझॉन ग्रेट फेस्टिव्हल सेलमध्ये, तुम्ही Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोन प्रास्ताविक किंमतीत खरेदी करू शकाल. जिथे ६GB + १२८ GB वेरिएंट २६,९९९ रुपयांमध्ये येईल. त्याचबरोबर ८GB + १२८ GB स्टोरेज व्हेरिएंट २८,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोनवर HDFC कार्ड खरेदीवर १० टक्के सूट देण्यात येत आहे. तसेच, १००० रुपयांची अतिरिक्त सूट देखील यावर उलब्ध आहे. मात्र, ही सवलत फक्त प्राइम मेंबर्ससाठी असेल. फोनवर ५,००० रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. याशिवाय, तुम्ही फोनला नो-कॉस्ट ईएमआय पर्यायावर खरेदी करू शकाल. फोन खरेदीवर ६ महिन्यांसाठी मोफत स्क्रीन रिप्लेसमेंटची सुविधा उपलब्ध असून ३ ऑक्टोबरपासून फोनची विक्री सुरू होईल. प्राईम सदस्यांसाठी, हा फोन २ ऑक्टोबरपासून, एक दिवस आधी विक्रीसाठी उपलब्ध होईल. Samsung Galaxy M52 5G : फीचर्स फोनमध्ये ६.७ -इंच Infinity-O डिस्प्ले असून फोन FHD + सुपर AMOLED डिस्प्लेसह येईल. त्याचा रिफ्रेश रेट १२० Hz असेल. गॅलेक्सी M52 5G स्मार्टफोनमध्ये ६nm स्नॅपड्रॅगन 778G चिपसेटचा सपोर्ट आहे. फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी M52 5G स्मार्टफोनच्या मागील पॅनलवर ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा मुख्य कॅमेरा ६४ MP आहे. याशिवाय, १२१ MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स देण्यात आले आहेत. तसेच ५ एमपी मॅक्रो लेन्स उपलब्ध आहे. सेल्फीसाठी ३२ एमपी कॅमेरा आणि पॉवर बॅकअप साठी फोन मध्ये ५००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फोन २५W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येत असून २० तास व्हिडिओ प्लेबॅक वेळ देते. हा फोन अँड्रॉइड ११ आधारित वन यूआय ३.१ वर काम करतो. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ofqFf8

Comments

clue frame