नवी दिल्ली : तुम्ही जर चुकीची माहिती सोशल मीडियावर इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करत असाल तर सावध होण्याची गरज आहे. युट्यूबने आपल्या प्लॅटफॉर्मवरून १० लाखांपेक्षा अधिक हटवले आहे. जे व्हीडिओ काढून टाकण्यात आले आहेत, यामध्ये संदर्भात चुकीची माहिती पसरवली जात होती. याबाबत बोलताना कंपनीचे चीफ प्रोडक्ट ऑफिसर नील मोहन म्हणाले की, कंपनीने आपल्या धोरणानुसार या व्हीडिओंना हटवले आहे. कंपनी चुकीच्या माहितीच्या विरोधात असून, लगातार कारवाई करत आहे. वाचा: मोहन यांनी सांगितले की, फेब्रुवारी २०२० पासून आतापर्यंत करोना व्हायरससंदर्भात चुकीची माहिती पसरवणारे १० लाख व्हीडिओ काढून टाकण्यात आली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, यावर अनेक दिवसांपासून काम सुरू आहे. दर तिमाहीनुसार या व्हीडिओंना हटवण्यात आले असून, या व्हिडीओंना १० पेक्षा कमी वेळा पाहण्यात आले होते. ते पुढे म्हणाले की, या व्हीडिओंना काढून टाकणे महत्त्वाचे होते. कारण यूजर्सला चुकीची माहिती मिळत होती व अनेकजण यावर विश्वास ठेवतात. युट्यूबने माहिती दिली की, नोव्हेंबर २०२० मध्ये अनेक अशा व्हीडिओंना हटवण्यात आले होते, ज्यात अमेरिकेतील निवडणुकीशी संबंधित चुकीची माहिती देण्यात आली होती. लवकरच लाँच करणार नवीन फीचर कंपनी यूजर एक्सपिरियन्स वाढवण्यासाठी अनेक फीचरवर काम करत आहे. यापैकीच एक चॅप्टर फीचर आहे. हे आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि मशीन लर्निंग अल्गोरिद्मसवर आधारित आहे. या फीचरद्वारे यूजर्स आपोआप चॅप्टर व्हिडीओशी कनेक्ट करू शकतात. आतापर्यंत यूजर्सला स्वतः चॅप्टर्सशी जोडावे लागत होते. या फीचरचे सध्या टेस्टिंग सुरू आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WBoxTj
Comments
Post a Comment