Xiaomi लवकरच लाँच करणार इलेक्ट्रिक वाहन, ‘या’ कंपनीला खरेदी करण्याच्या तयारीत

नवी दिल्ली : निर्माता आता हँडसेटपेक्षा वेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे. कंपनीने घोषणा केली आहे. ७७.४ मिलियन डॉलर्समध्ये ऑटोनॉमस ड्राइव्हिंग टेक्नोलॉजी स्टार्टअप डीपमोशनला खरेदी करणार आहे. या करारासोबतच, कंपनी लवकरच बाजारात लाँच करण्याची शक्यता आहे. वाचा: आपल्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी लेव्हल ४ सेल्फ ड्राइव्हिंग टेक्नोलॉजी विकसित करणार आहे. डीपमोशनच्या खरेदीनंतर कंपनी ड्राइव्हर असिस्टेंस सॉफ्टवेअर तयार करणार आहे. खूप कमी कालावधीत शाओमी आपली पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करेल. Xiaomi चे अध्यक्ष वांग जियांग म्हणाले की, या अधिग्रहणाद्वारे आम्हाला प्रोडक्ट कमी वेळेत आणायचे आहे. Xiaomi चे सह-संस्थापक आणि सीईओ लेई जून स्वतः इलेक्ट्रिक व्हीलक तयार करण्याच्या प्रोजेक्टचे नेतृत्व करतील. कंपनीने आधीच या क्षेत्रात पुढील दशकभरात १० बिलियन डॉलर्स गुंतवणूक करणार असल्याचे म्हटले होते. डीपमोशनचे अधिग्रहण करत कंपनीने या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. याशिवाय कंपनीने इलेक्ट्रिक व्हीकल्सच्या निर्मितीसाठी ५०० इंजिनिअर्सची भरती सुरु केली आहे. यासाठी अनेक ऑटोमेकर्स आणि अधिकाऱ्यांशी संपर्कात आहे. रिपोर्टनुसार, चीनी कंपनी ग्रेट वॉल मोटरच्या कारखान्यापैकी एकाचा वापर करून इलेक्ट्रिक वाहन तयार करण्याची योजना आहे. शाओमी ब्लॅक सेसम टेक्नोलॉजी या कारसाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस चिप्स आणि सिस्टम विकसित करणाऱ्या कंपनीत गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. इलेक्ट्रॉनिक व्हीकल्स खूपच आधुनिक फीचर्ससह येतात, ज्यात अनेक गोष्टींचा समावेश आहे. या लिस्टमध्ये गॅजेट्स, फीचर्स आणि ड्राइव्ह असिस्टेंट सिस्टमचा समावेश आहे. अशात शाओमी योग्य दिशेने पुढे जात आहे. केवळ शाओमीच एकमेवर स्मार्टफोन निर्माता कंपनी नाही, जी इलेक्ट्रिक वाहन बाजारात पाऊल टाकण्याची तयारी करत आहे. Huawei, Oppo आणि Apple देखील इतर मेकर्ससह इलेक्ट्रिक व्हीकलवर काम करत असल्याचे रिपोर्ट समोर आले होते. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3joAq81

Comments

clue frame