नवी दिल्लीः जर तुम्हाला बेस्ट ऑफर आणि डिस्काउंटमध्ये नवीन स्मार्ट टीव्ही किंवा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर शाओमीचा Mi Flagship Days सेल तुमच्यासाठी सुरू आहे. हा सेल २७ ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या सेलमध्ये युजर शाओमीचे पॉप्यूलर स्मार्टफोन्स शिवाय, स्मार्ट टीव्ही सुद्धा बेस्ट डीलमध्ये खरेदी करू शकता. Mi.com आणि Mi स्टोर अॅप वर सुरू असलेल्या या सेल मध्ये स्मार्टफोन वर २० हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. तसेच या सेल मध्ये SBI च्या क्रेडिट वरून शॉपिंग केल्यास कंपनीकडून ३ हजार रुपयांपर्यंत एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. जाणून घ्या शाओमीच्या या धमाकेदार सेलमध्ये स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्हीवर मिळणाऱ्या काही बेस्ट डिल संबंधी माहिती. वर २० हजारांची सूट हा फोन या सेलमध्ये तुम्हाला १५ हजार रुपयाच्या सूट सोबत मिळेल. सेलमध्ये या फोनची किंमत ४९ हजार ९९९ रुपयांऐवजी ३४ हजार ९९९ रुपये आहे. फोनवर कंपनी ५ हजार रुपयाचा एक्सचेंज बोनस देत आहे. या दोन्ही ऑफर मिळून फोनवर मिळणारा डिस्काउंट २० हजार रुपयाचा होतो. Mi 11X वर जबरदस्त डील सेलमध्ये शाओमीचा हा प्रीमियम फोन ९ हजार रुपयाच्या सूट सोबत उपलब्ध आहे. कंपनी या फोनवर ५ हजार रुपयाचा Mi Exchange Bonus सुद्धा देत आहे. फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा दिला आहे. याशिवाय, फोनमध्ये तुम्हाला ८ जीबी पर्यंत रॅम आणि स्नॅपड्रॅगन ८७० चिपसेट दिला आहे. Mi 10T Pro वर १७ हजार ५०० रुपयाची सूट या फोनला सेलमध्ये तुम्ही ४७ हजार ९९९ रुपयाच्याऐवजी ३४ हजार ४९९ रुपयात खरेदी करू शकता. कंपनी या फोनवर ४ हजार रुपयाचा Mi Exchange बोनस सुद्धा देत आहे. शाओमीचा प्रीमियम स्मार्टफोन १०८ मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर सोबत येतो. Mi TV 4A 108cm (43) Horizon Edition Grey शाओमीचा हा जबरदस्त टीव्ही या सेलमध्ये सूट सोबत खरेदी करू शकता. या टीव्हीची किंमत २९ हजार ९९९ रुपयांऐवजी २६ हजार४९९ रुपये झाली आहे. टीव्ही वर कंपनी ५०० रुपयाचा कूपन ऑफर देत आहे. Mi TV 4X 125.7 cm (50)वरही मस्त ऑफर शाओमीचा हा स्मार्ट टीव्ही सेलमध्ये ४१ हजार ९९९ रुपयाच्या किंमतीऐवजी ३६ हजार ४९९ रुपयात खरेदी करू शकता. हा टीव्ही 4K HDR डिस्प्ले आणि इन-बिल्ट गूगल असिस्टेंट सोबत येतो. दमदार साउंडसाठी यात डॉल्बी आणि डीटीएस एचडी सपोर्ट सोबत २० वॉटचे स्पीकर्स दिले आहेत. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jkA5Df
Comments
Post a Comment