Xiaomi Mi Band 6 चा भारतात सेल सुरू, खरेदीआधी पाहा टॉप ५ फीचर्स, ५०० रुपयांची सूट

नवी दिल्लीः Xiaomi Mi Smart Band 6 Price in India: जर तुम्हाला फिटनेस बँड खरेदी करायचा असेल तर नुकतीच शाओमीने Mi Band 5 ची अपग्रेड Mi Band 6 बँड बाजारात उतरवली आहे. आजपासून या लेटेस्ट मी बँडला विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. जर तुम्हाला Mi Band 6 खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर त्याआधी या Fitness Tracker चे फीचर्स जाणून घ्या. Mi Band 6 चे फीचर्स या बँड मध्ये १.५६ इंचाचा (152x486 पिक्सल) फुल स्क्रीन अमोलेड टच स्क्रीन दिले आहे. याची पीक ब्राइटनेस ४५० निट्स आणि पिक्सल डेनिसिटी ३२६ पिक्सल प्रति इंच आहे. पर्सनलाइज्ड एक्सपीरियंससाठी थीम्स आणि ८० हून जास्त कस्टमाइजेबल बॅड फेस (Mi Smart Band 6 watch faces) दिले आहे. Mi Smart Band 6 मध्ये इन बिल्ट सेन्सर दिले आहे. जे ३० वर्कआउट अॅक्टिविटी ट्रॅक करण्यात मदत करतील. यात प्रोफेशनल स्पोर्ट्स क्रिकेट आणि इनडोर ट्रेनिंग सारखे स्ट्रेचिंग आदीचा समावेश आहे. वाचाः Mi Smart Band 6 मध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग आणि स्लिप ट्रॅकिंग फीचर्स मिळतील. स्लीप ट्रॅकिंग फंक्शनला एनहान्स्ड केले आहे. स्लीप सायकल, रॅपिड आय मूव्हमेंट आमि स्लीप ब्रिदिंग क्वॉलिटीला मॉनिटर करते. या Xiaomi Fitness Band मध्ये फीमेल हेल्थ ट्रॅकिंग आणि स्ट्रेस मॉनिटरिंग सारखे फीचर्स शिवाय, ब्लड ऑक्सिजन लेवल साठी SpO2 सपोर्ट दिले आहे. सिंगल चार्जमध्ये बँड ६ फिटनेस बँड १४ दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ देते. वॉटर रेसिस्टेंससाठी बँड 5 ATM सर्टिफाइड आहे. क्विक क्लिप ऑन आणि क्विक क्लिप ऑफ चार्जिंगसाठी मॅग्नेटिक पोर्ट्स दिले आहेत. ची किंमत ३ हजार ४९९ रुपये आहे. ग्राहक याला बँडला ब्लू, लाइट ग्रीन, ऑरेंज आणि मरुन रंगात खरेदी करू शकता. अॅमेझॉन आणि मी डॉट कॉमवरून खरेदी केल्यास ५०० रुपयाची सूट मिळू शकते. वाचा: वाचा: वाचा: वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kE1Ndo

Comments

clue frame