Vi युजर्संचे आणखी टेन्शन वाढले, कंपनीने बंद केले हे दोन प्रीपेड प्लान, पाहा डिटेल्स

नवी दिल्लीः वोडाफोन आयडियाने गेल्या वर्षी जानेवारी मध्ये लाँच केलेले दोन प्रीपेड प्लान बंद केले आहेत. बंद केलेल्या प्लानमध्ये ५५८ रुपये आणि ३९८ रुपयाच्या प्लानचा समावेश आहे. कंपनीने ५५८ रुपयाचा प्रीपेड प्लान केवळ मध्य प्रदेश सर्कल आणि ३९८ रुपयाचा प्रीपेड प्लान मध्य प्रदेश शिवाय, मुंबई सर्कलमध्ये लाँच केला होता. त्यामुळे कंपनीने हे प्लान बंद करून आपल्या ग्राहकांची नाराजी ओढवून घेतली आहे, असे म्हणता येणार आहे. याआधी कंपनीने आपला सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान ४९ रुपयाचा काही सर्कलमध्ये बंद केला होता. वाचा: ५५८ रुपयाचा प्लान या प्लानची वैधता ५६ दिवसाची आहे. प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग सोबत डेली ३ जीबी डेटा मिळत होता. याशिवाय, रोज १०० एसएमएस सुद्धा मिळत होते. वाचा: ३९८ रुपयाचा प्लान या प्लानची वैधता २८ दिवसाची होती. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, डेली ३ जीबी डेटा सोबत डेली १०० एसएमएस मिळत होते. याशिवाय, अतिरिक्त बेनिफिट्स म्हणून वोडाफोन मूव्ही अँड टीव्हीचे अॅक्सेस मिळत होते. वाचा: स्वस्त ४९ रुयपाचा प्रीपेड प्लान बंद रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, वोडाफोन आयडियाने देशातील अनेक सर्कलमध्ये आपला ४९ रुपयाचा प्रीपेड प्लान बंद केला होता. परंतु, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश मध्ये हा टॅरिफ प्लान अजूनही उपलब्ध आहे. या प्लानमध्ये १४ दिवसाची वैधता सोबत ३८ रुपयाचा टॉकटाइम आणि १०० एमबी डेटा मिळत होता. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WzJE84

Comments

clue frame