२८ आणि ८४ दिवसांची वैधता असणारे Reliance Jio चे Recharge प्लान्स इतरांपेक्षा २० % स्वस्त, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : चे प्लान इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्त असतात. टेलिकॉमटॉकच्या अहवालानुसार, Reliance Jio चे २८ दिवस आणि ८४ दिवसांचे प्लान Airtel आणि Vodaphone-Idea च्या तुलनेत ७ ते २० टक्के स्वस्त आहेत. या व्यतिरिक्त, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया ने अलीकडेच ४९ रुपयांचे त्यांचे प्रवेश-स्तरीय प्रीपेड प्लॅन बंद केले आहेत. आता या दोन्ही कंपन्यांनी ७९ रुपयांचा एंट्री-लेव्हल प्लान आणला आहे, जो पूर्वीच्या तुलनेत ६० टक्के अधिक महाग आहे. वाचा: Reliance Jio २८ दिवसांचा रिचार्ज प्लान Reliance Jio चा २८ दिवसांचा रिचार्ज प्लान १२९ रुपयांपासून सुरू होतो. जिओचा २८ दिवसांचा सर्वात महागडा प्लान ४०१ रुपये आहे. याशिवाय, जिओकडे १९९, २४९ आणि ३४९ रुपयांचे रिचार्ज प्लान आहेत, जे २८ दिवसांच्या वैधतेसह येतात. जिओच्या या सर्व प्लानमध्ये मोफत कॉलिंगचा लाभ कोणत्याही नेटवर्कवर उपलब्ध आहे. तसेच, जिओ अॅप्सची सदस्यता मोफत आहे. १२९ रुपयांच्या प्लानमध्ये एकूण २ GB डेटा आणि ३०० SMS उपलब्ध आहेत. त्याचबरोबर ४०१ रुपयांच्या प्लानमध्ये जास्तीत जास्त ९० GB डेटा उपलब्ध आहे. या प्लानमध्ये दररोज ३ GB डेटा आणि ६ GB अतिरिक्त डेटा दिला जातो. प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस पाठवले जाऊ शकतात. तसेच, डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन १ वर्षासाठी मोफत उपलब्ध आहे. ३४९ रुपयांच्या प्लानमध्ये एकूण ८४ GB डेटा जिओच्या १९९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज १.५ GB डेटा उपलब्ध आहे. या प्लानमध्ये एकूण ४२ GB डेटा आणि दररोज १०० SMS पाठवण्याची सुविधा आहे. २४९ रुपयांच्या प्लानमध्ये एकूण ५६ GB डेटा उपलब्ध आहे. प्लानमध्ये दररोज १०० SMS उपलब्ध आहेत. त्याचबरोबर ३४९ रुपयांच्या प्लानमध्ये एकूण ८४ GB डेटा उपलब्ध आहे. Reliance Jio चा ८४ दिवसांचा रिचार्ज प्लान Jio च्या ८४ दिवसांच्या रिचार्ज प्लानबद्दल सांगायचे तर ते ३२९ रुपयांपासून सुरू होतात. ८४ दिवसांचा सर्वात महागडा प्लान ९९९ रुपयांचा आहे. या सर्व प्लान्समध्ये, कोणत्याही नेटवर्कमध्ये मोफत कॉलिंगचा लाभ आणि जिओ अॅप्सची सदस्यता उपलब्ध आहे. ३२९ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये एकूण ६ GB डेटा आणि १००० SMS उपलब्ध आहेत. याशिवाय ५५५ आणि ७७७ रुपयांचेही प्लान आहेत. ५५५ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज १२६ GB डेटा आणि १००० SMS दिले जातात. त्याच वेळी, ७७७ रुपयांच्या प्लानमध्ये १३१ GB डेटा आणि १ वर्षासाठी डिस्ने + हॉटस्टारचे सदस्यत्व दिले जाते. जिओचा ५९९ रुपयांचा प्लान देखील आहे. या प्लानमध्ये एकूण १६८ GB डेटा उपलब्ध आहे. जिओच्या ९९९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्सना एकूण २५२ GB डेटा आणि दररोज १०० SMS पाठवण्याची सुविधा मिळते. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BeHMAI

Comments

clue frame