नवी दिल्लीः रियलमी सध्या आपल्या Narzo 50 सीरीज ला लाँच करण्याची तयारी करीत आहे. गेल्या आठवड्यात 91 मोबाइल्स ने या सीरीजचा स्मार्टफोन 50A चे रेंडर्सला लीक केले होते. या दरम्यान, आता टिप्स्टर मुकुल शर्मा यांनी खुलासा केला होता. कंपनी लवकरच नार्जो ५० सीरीजचा स्मार्टफोन Narzo 50i ला भारतात लाँच करणार आहे. यासोबतच टिप्स्टर नार्जो 50i चे व्हेरियंट आणि कलर ऑप्शन संबंधी सर्व माहिती समोर आली आहे. वाचा: दोन व्हेरियंट मध्ये येईल रियलमी नार्जो 50i रियलमी 50i स्मार्टफोन भारतात दोन व्हेरियंट मध्ये म्हणजेच २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज आणि ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेज दिले जाणार आहे. हा फोन मिंट ग्रीन आणि कार्बन ब्लॅक कलर मध्ये लाँच केला जावू शकतो. फोनची फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स संबंधी अजून काही माहिती समोर आली नाही. रियमली नार्जो 50A ची होणार एन्ट्री रियलमी नार्जो ५० सीरीज अंतर्गत कंपनी नार्जो ५० ए स्मार्टफोन सुद्धा लाँच करणार आहे. लीक झालेल्या रिपोर्टनुसार, या फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच डिझाइनचा डिस्प्ले मिळणार आहे. फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये बॅक पॅनेलवर एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल कॅमेरा सेटअप ऑफर करणार आहे. याशिवाय, फोनच्या बॅक पॅनेलवर एक फिंगरप्रिंट स्कॅनर सुद्धा दिला जावू शकतो. वाचा: फोनच्या बॉटम मध्ये एक स्पीकर ग्रिल शिवाय, एक यूएसबी टाइप सी पोर्ट आणि एक 3.5mm जॅक दिला आहे. फोनच्या स्पेसिफिकेशन संबंधी अजूनही जास्त माहिती समोर आली नाही. नार्जो ५० सीरीजच्या लाँचिंग तारखे संबंधी अजून कंपनी कडून कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु, असे मानले जात आहे की, फोन पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्यात एन्ट्री करू शकतो. वाचा : वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sXd24o
Comments
Post a Comment