नवी दिल्ली: आज खरेदीपासून बँकिंगपर्यंत सर्व काही ऑनलाइन करता येते. देखील ऑनलाईन सुविधा अधिक सोयीस्कर करण्यासाठी काम करते. देशातील सर्वात मोठी ई-वॉलेट कंपनी, पेटीएम आपल्या युजर्सना भरपूर सुविधा देते. यात Paytm वॉलेटसह तुम्ही तुमचे बँक खाते देखील लिंक करू शकता, तुमची बिले भरू शकता आणि शॉपिंग करू शकता. सध्या Paytm ने युजर्ससाठी एक मस्त ऑफर सुरु केली आहे. पाहा डिटेल्स वाचा: काय आहे ऑफर २४ ऑगस्टपासून पेटीएमने Wow वॉलेट डेज नावाची ऑफर सुरु केली आहे, ज्यामध्ये युजर्सना त्यांच्या वॉलेटमध्ये विशिष्ट रक्कम टाकल्यावर कॅशबॅकसह अनेक ऑफर मिळत आहेत. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी, प्रथम पेटीएम अॅप अघडून 'कॅशबॅक आणि ऑफर्स' विभागात जावे लागेल , तेथे तुम्हाला Wow वॉलेट डेजचे बॅनर दिसेल. कधीकधी तुम्ही हे बॅनर अॅपच्या मुख्य पेजवर पाहू शकता. पेटीएमची ही ऑफर ३१ ऑगस्टपर्यंत सुरु राहील. कॅशबॅक कसा मिळवायचा तुम्ही Paytm वर तीन प्रकारे Wow Wallet Days ऑफरचा लाभ घेऊ शकता. जर तुम्ही तुमच्या पेटीएम वॉलेटमध्ये ५ हजार रुपये ठेवले तर तुम्हाला १ हजार कॅशबॅक पॉइंट्स मिळतील (१० रुपयांचे गिफ्ट व्हाउचर), जर तुम्ही १५ हजार रुपये ठेवले तर तुम्ही ५ हजार कॅशबॅक पॉइंट्स (५० रुपयांचे गिफ्ट व्हाउचर) आणि तुमचे पेटीएम वॉलेट तुम्ही २५ हजार रुपये लोड केल्यास तुम्हाला १० हजार कॅशबॅक पॉइंट्स (१०० रुपयांचे गिफ्ट व्हाउचर) मिळतील. पण ,जर तुम्ही हे पैसे तुमच्या वॉलेटमध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI द्वारे ठेवले तर तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. तुम्हाला हे पैसे कोणत्याही दुकानातून मिळाले तर तुम्हाला पैसे भरावे लागतील. त्यासाठी निश्चित शुल्क असेल . कॅशबॅक पॉइंट कसे रिडीम करावे हे पैसे टाकल्यावर तुम्हाला मिळणारे कॅशबॅक पॉइंट तुम्ही रिडीम करू शकता आणि तुम्हाला पेटीएम गिफ्ट व्हाउचर मिळू शकतात. १०० कॅशबॅक पॉइंट्स एक रुपया बनवतात. हे गिफ्ट व्हाउचर तुमच्या वॉलेटमध्ये म्हणजेच तुमच्या पेटीएम बॅलन्समध्ये जोडले जाईल. तुम्ही कितीही कॅशबॅक व्हाउचर जिंकले तरी तुम्ही ते मित्राला पाठवू शकणार नाही किंवा कोणत्याही बँक खात्यात ट्रान्सफर करू शकणार नाही. तुम्ही ही रक्कम एकतर Paytm अॅपवर व्यवहार करण्यासाठी वापरू शकता किंवा तुम्ही कोणत्याही दुकानदाराला पैसे देण्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन देखील वापरू शकता. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WmdOfD
Comments
Post a Comment