मस्तच! पत्ता शोधण्यासाठी आले स्वदेशी pataa App, पाहा काय आहे यात खास

नवी दिल्ली : तुम्हाला पत्ता शोधण्यासाठी आता कुणचीही वाट पाहावी लागणार नाही. तसेच कोणाला फोन सुद्धा करण्याची गरज नाही, कारण, आता देसी अॅप पत्ता अॅप आले आहे. या अॅपमध्ये, युजर्स स्वतः त्यांच्या घराचा पत्ता जिओ टॅग करू शकतील. यामुळे हरवण्याची किंवा इतरांना पत्ता विचारण्याची समस्या दूर होईल. पत्ता अॅप घराच्या अचूक ठिकाणी पोहोचण्यास मदत करेल. वाचा: पत्ता अॅप लाँच करण्यामागची कल्पना गूगल मॅप आणि मॅप माय इंडिया नेव्हिगेशन अॅप, कोणत्याही डिलिव्हरीसाठी वारंवार पत्ता आवश्यक असतो. संशोधन दर्शविते की भारतातील सुमारे ५० ते ६० टक्के लोक या प्रकारच्या समस्येला सामोरं जात आहे. याचे कारण भारताची चुकीची अॅड्रेसिंग सिस्टीम आहे. चुकीच्या अॅड्रेसिंग सिस्टीममुळे भारताला दरवर्षी ७५,००० कोटी रुपयांचे नुकसान होते. या समस्येवर पत्ता अॅप मात करेल. ज्यामध्ये लोक स्वतःचा पत्ता तयार करू शकतात. ३ महिन्यांत पत्ता अॅपचा ४० लाख आणि पुढील ६ महिन्यांत १ ते २० दशलक्ष युजर बेस असेल अशी अपेक्षा आहे. घराचे अचूक स्थान कसे मिळवायचे? पत्ता अॅपमध्ये ३ मीटरची अचूकता उपलब्ध असेल. यासाठी संपूर्ण पृथ्वी ३*३ ब्लॉकमध्ये विभागली आहे. प्रत्येक ब्लॉकला क्रमांक दिला आहे. अशा प्रकारे कोणत्याही ब्लॉकचे अचूक स्थान शोधता येते. तसेच, ३ मीटरच्या परिघात पिन ड्रॉप सुविधा असेल. यासह, युजर्सना खुणा बनवण्याची सुविधा दिली जाईल. तसेच, घराच्या फोटोवर क्लिक करून जोडता येईल यात युजर्सना व्हॉइस रेकॉर्डची सुविधा मिळेल. ज्यामुळे पत्ता पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज भासणार नाही. पत्ता अॅपवरील मार्गांची अचूक माहिती कशी मिळवायची युजर्सना त्यांच्या जवळच्या स्थानाच्या खुणापासून ते पत्ताद्वारे घरापर्यंत स्थान सेट करण्याची सुविधा दिली जाते. हे आपल्याला चुकीचा आणि सर्वात लहान मार्ग निवडण्याची परवानगी देईल.या अॅपमधील गुंतवणुकीसंदर्भात अनेक पातळ्यांवर वाटाघाटी सुरू आहेत. येत्या काही आठवड्यांत गुंतवणुकीसंदर्भात मोठी घोषणा केली जाईल. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jetwlr

Comments

clue frame