नवी दिल्लीः प्रीमियम स्मार्टफोन ब्रँड OnePlus च्या लेटेस्ट स्मार्टफोन Nord 2 5G च्या ग्रीन वुड्स कलर वेरिएंटची आजपासून विक्री सुरू होणार आहे. हा सेल ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनवर दुपारी १२ वाजेपासून सुरू होणार आहे. नवीन कलर ऑप्शन सोबत युजर्संना मॅट फिनिशिंगची मजा घेता येणार आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 1200 AI प्रोसेसर दिले आहे. यात पॉवर साठी 4,500mAh ची बॅटरी दिली आहे. जाणून घ्या डिटेल्स. किंमत किती स्मार्टफोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या फोनची किंमत २९ हजार ९९९ रुपये आहे. याशिवाय, या फोनच्या टॉप व्हेरियंटची १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेजच्या फोनची किंमत ३४ हजार ९९९ रुपये आहे. डिस्प्ले आणि प्रोसेसर OnePlus Nord 2 5G मध्ये ६.४३ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 1200 AI प्रोसेसर दिला आहे. हा फोन अँड्रॉयड ११ बेस्ड Oxygen OS 11.3 वर काम करतो. या फोनमध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज दिले आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4,500mAh ची बॅटरी दिली आहे. जी ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. कंपनीचा दावा आहे की, फोन फक्त अर्ध्या तासात फुल चार्ज होतो. या फोनला ब्लू हेज, ग्रे सिएरा आणि ग्रीन वूड्स कलर ऑप्शन सोबत उपलब्ध करण्यात आले आहे. फोनचा कॅमेरा फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये जबरदस्त फीचर्स दिले आहेत. OnePlus Nord 2 5G फोनचा प्रायमरी कॅमेरा ५० मेगापिक्सलचा SONY IMX766 आहे. सोबत ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स दिला आहे. याशिवाय, २ मेगापिक्सलचा मोनो लेन्स दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी यात ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yilInc
Comments
Post a Comment