१०८MP कॅमेऱ्यासह येतात ‘हे’ धमाकेदार स्मार्टफोन्स, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्ली : अनेक यूजर्स खरेदी करताना कॅमेरा किती मेगापिक्सल आहे हे पाहतात. फोन खरेदी करताना अधिक बॅटरी क्षमता, शानदार डिस्प्ले, प्रोसेसरसह येणारे हँडसेट खरेदी करतात. तुम्ही देखील १०८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येणारा फोन शोधत असाल तर बाजारात १८ हजार रुपयांपासून ते ४० हजार रुपयांपर्यंतचे शानदार फोन्स उपलब्ध आहेत. अशाच टॉप-५ फोन्सविषयी जाणून घेऊया. वाचा: या फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल लेंस, एक मॅक्रो लेंस आणि एक ब्लॅक अँड व्हाइट लेस मिळेल. फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. या फोनची किंमत १७,९९९ रुपये आहे. यात ६.४ इंच सुपर एमोलेड फुल स्क्रीन डिस्प्लेसह ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळते. यात स्नॅपड्रॅगन ७२०जी प्रोसेसर, ५० वॉट फास्ट चार्जिंगसह ४५०० एमएएचची बॅटरी मिळेल. मोटोरोलाचा हा फोन ट्रिपल-कॅमेरा सेटअपसह येतो. यात १०८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड सेंसर आणि २ मेगापिक्सल डेप्थ सेंसर मिळेल. फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. यात ६.७८ इंच फुल एचडी+ डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७३२जी प्रोसेसर, ६ जीबी + १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. फोन फ्लिपकार्टवर १७,९९९ रुपयात उपलब्ध आहे. या फोनची किंमत १९,९९९ रुपये आहे. फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळतो. स्टोरेजला एसडी कार्डने ५१२जीबीपर्यंत वाढवू शकता. यात क्वाड कॅमेरा सेटअप मिळेल. याचा मुख्य कॅमेरा १०८ मेगापिक्सल, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस, २ मेगापिक्सल पोर्ट्रेट लेंस आणि ५ मेगापिक्सल मॅक्रो सेंसर मिळतो. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७३२जी प्रोसेसर, ३३ वॉट फास्ट चार्जंग सपोर्टसह ५०२० एमएएचची बॅटरी मिळते. शाओमी एमआय १०i या फोनमध्ये १०८ मेगापिक्सल मुख्य कॅमेऱ्यासह क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. याचा फ्रंट कॅमेरा १६ मेगापिक्सल आहे. यात ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळते. स्नॅपड्रॅगन ७५०जी प्रोसेसर आणि ४८२०एमएएच बॅटरीसह येणाऱ्या या फोनची किंमत २३,९९९ रुपये आहे. शाओमी मी ११X प्रो शाओमीच्या या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये १०८ मेगापिक्सलचा मुख्य सेंसरसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यात फ्रंटला २० मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. फोनमध्ये ८ जीबी + २५६ जीबी स्टोरेज, ४५२० एमएएच बॅटरी, ६.६७ इंच डिस्प्ले मिळतो. फोनची किंमत ३९,९९० रुपये आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Bksw5z

Comments

clue frame