व्हॉट्सअॅपवर असे पाठवा Krishna Janmashtami 2021 स्टिकर्स, अशा पाठवा शुभेच्छा

नवी दिल्लीः WhatsApp Stickers: जन्माष्टमी अर्थात श्रीकृष्ण जयंती आज देशभरात साजरी केली जात आहे. श्रीकृष्णाचा जन्मोत्सव देशात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने अनेक जण आपल्या नातलगांना, मित्र मंडळींना शुभेच्छा देत असतात. जर तुम्हाला इंस्टेंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप द्वारे जन्माष्टमीच्या शुभेच्छा द्यायचा असतील तर व्हॉट्सअॅप स्टिकर्सचा वापर करू शकतो. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी 2021 WhatsApp Stickers पाठवण्याची पद्धत सांगणार आहोत. व्हॉट्सअॅप वेगवेगळ्या सणांनिमित्त नवीन पॅक घेवून येते. या प्लॅटफॉर्मवर नुकतेच Happy Rakhi स्टिकर पॅक आले होते. त्याला गुगल प्ले स्टोर किंवा अॅप स्टोरद्वारे वेगळ्या पद्धतीने डाउनलोड करू शकतो. जन्माष्टमी निमित्त सध्या कोणताही नवीन पॅक आला नाही. त्यामुळे तुम्हाला अॅप स्टोरचा वापर करावा लागेल. जाणून घ्या स्टिकर पॅक डाउनलोड करण्याची पद्धत. जन्माष्टमी २०२१ वर असे डाउनलोड करा WhatsApp stickers Step 1: आपल्या आयफोन किंवा अँड्रॉयड स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप ओपन करा. कोणत्याही चॅटमध्ये जावून स्टिकर बटनवर टॅप करा. Step 2: या ठिकाणी तुम्हाला इंस्टॉल करण्यात आलेले स्टिकर दिसतील. ज्यात उजव्या बाजुला (+) बटन दिसेल. या बटनवर टॅप करा. Step 3: सध्या या ठिकाणी जन्माष्टमी पॅक उपलब्ध नाही. त्यासाठी Get more stickers पॅकवर टॅप करावे लागेल. या ठिकाणी फक्त अँड्रॉयड युजर्ससाठी उपलब्ध आहे. Step 4: आता तुम्ही थेट Google Play Store स्टोरवर जाल. iOS यूजर्स ला अॅप स्टोरवर जावे लागेल. आता मॅन्यूअली स्टिकर्स सर्च करावे लागेल. Step 5: या ठिकाणी तुम्ही Janmashtami stickers for WhatsApp सर्च करू शकता. तसेच आपल्या पसंतीच्या पॅकची निवड करू शकता. Step 6: पॅक इंन्स्टॉल केल्यानंतर याला ओपन करा आणि व्हॉट्सअॅपवर पॅक जोडा. यानंतर तुम्ही तुमच्या मित्रांना, कुटुंबातील व्यक्तींना तसेच नातलगांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा देवू शकता. वाचा : वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3h2LOF1

Comments

clue frame