नवी दिल्ली : जगातील सर्वात स्वस्त ४जी स्मार्टफोन च्या लाँचिंगची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. फोनचे प्री-बुकिंग या आठवड्यापासून सुरू होणार आहे. ग्राहक फोनला केवळ १० टक्के रक्कम देऊन बुक करू शकतात. इतर रक्कम ईएमआयनुसार भरता येईल. यासाठी रिलायन्स जिओने एसबीआयसह ५ बँकांसोबत भागीदारी केली आहे. भारतात २५ कोटी २जी फीचर फोन ग्राहकांना स्मार्टफोनमध्ये शिफ्ट होण्यास मदत करेल. यासाठी कंपनी अनेक बँकिंग ऑफर्स देखील देणार आहे. कंपनीने पुढील ६ महिन्यात ५ कोटी विक्रीचे लक्ष्य ठेवले आहे. वाचा: किंमत रिपोर्टनुसार, JioPhone Next स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत ५ हजार रुपयांपेक्षा कमी असेल. त्यामुळे ग्राहक ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत फोनला घरी घेऊन जाऊ शकता. फोनच्या टॉप व्हेरिएंटची किंमत जवळपास ७ हजार असेल. JioPhone Next स्मार्टफोन १० सप्टेंबरपासून उपलब्ध आहे. तर १ सप्टेंबरपासून प्री-बुकिंग सुरू होईल. JioPhone Next चे स्पेसिफिकेशन्स JioPhone Next स्मार्टफोनमध्ये ५.५ इंच एचडी डिस्प्ले मिळू शकतो, फोनमध्ये २ जीबी आणि ३ जीबी रॅमचा पर्याय मिळेल. सोबतच, १२ जीबी आणि ३२ जीबी स्टोरेज सपोर्ट मिळू शकते. जिओच्या या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 215 चिपसेट सपोर्ट दिला जाईल. फोन अँड्राइ ११ गो एडिशनवर काम करतो. यामध्ये रियरला १३ मेगापिक्सल आणि सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. पॉवरसाठी २५०० एमएएचची बॅटरी दिली जाईल. फोनमध्ये वॉइस ट्रांसलेशनसह अनेक कमालचे फीचर्स मिळतील. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zyywqL
Comments
Post a Comment