नवी दिल्ली : ने जूनमध्ये आयोजित केलेल्या ४४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपल्या सर्वात स्वस्त ४जी स्मार्टफोन ची घोषणा केली होती. गुगलसोबतच्या भागीदारी अंतर्गत कंपनीने हा फोन तयार केला आहे. यांनी माहिती दिली होती की फोनची विक्री १० सप्टेंबपरपासून सुरू होईल. आता जिओफोन नेक्स्टच्या प्री-बुकिंगविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वाचा: रिपोर्टनुसार, पुढील आठवड्यापासून प्री-बुकिंगसाठी उपलब्ध असेल. प्री-बुकिंगबाबत समोर आलेली ही माहिती खरी असण्याची शक्यता आहे, कारण १० सप्टेंबरपासून फोनची विक्री सुरु होणार आहे. जिओफोन नेक्स्ट रिलायन्सच्या LYF ब्रँड स्मार्टफोन पेक्षा वेगळा असेल. हा फोन गुगलसोबतच्या भागीदारी अंतर्गत तयार करण्यात आला आहे. हा फोन अशा लोकांसाठी आहे जे पहिल्यांदाच स्मार्टफोन खरेदी करणार आहेत. अद्याप फोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल काहीही माहिती दिलेली नाही. मात्र, अनेक टिप्स्टरच्या माध्यमातून फीचर्स समोर आलेले आहेत. फोनच्या किंमत देखील लीक झाली आहे. टिप्स्टरनुसार, जिओफोन नेक्स्टमध्ये ५.५ इंच डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन २१५ प्रोसेसर मिळेल. यात २ जीबी / ३ जीबी रॅम आणि १६ जीबी / ३२ जीबी स्टोरेज मिळू शकते. जिओफोन नेक्स्ट अँड्राइड ११ गो एडिशनसोबत येईल. याममध्ये Camera Go अॅप मिळेल, जे HDR, Night Mode आणि Snapchat फिल्टरसोबत येईल. या फोनमध्ये १३ मेगापिक्सल रियर आणि ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळेल. जिओफोन नेक्स्ट हँडसेटमध्ये ड्यूल सिम कार्ड स्लॉट मिळेल. यामध्ये ४जी VoLTE सपोर्ट मिळतो. पॉवरसाठी यात २५०० एमएएचची बॅटरी दिली जाईल. कंपनीने अद्याप अधिकृतपणे फोनच्या किंमतीचा खुलासा केलेला नाही. मात्र, रिपोर्टनुसार फोन जवळपास ३,४९९ रुपयात उपलब्ध होईल. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mI82Qh
Comments
Post a Comment