नवी दिल्ली : यांच्या प्लॅटफॉर्ममध्ये ३४ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक केल्यानंतर आता टेक कंपनी एअरटेलमध्ये गुंतणूक करण्याच्या तयारीत आहे. ही गुंतवणूक हजारो कोटी रुपयांची असू शकते. भारतीय बाजारात एअरेटल कंपनी जिओची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी आहे. वाचा: रिपोर्टनुसार, गुगल जवळपास वर्षभरापासून एअरटेलशी चर्चा करत आहे. ही चर्चा अंतिम टप्प्यात आली असून, लवकरच करार होऊ शकतो. दोन्ही कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि लीगल टीम कराराच्या बारकाव्यांविषयी काम करत आहे. या दोन्ही कंपन्यांशी या कराराबाबत विचारणा करण्यात आली. मात्र, त्यांनी उत्तर देणे टाळले. जिओसोबत केलेल्या करारामुळे प्रतिस्पर्धी कंपनीसोबत करार करण्यास निर्बंध येऊ शकतात का याविषयी गुगलला विचारले असता कंपनीने उत्तर दिले नाही. गुगल-एअरटेलमध्ये करार झाल्यास सुनील मित्तल यांच्यासाठी मोठा दिलासा ठरेल. कारण त्यांची कंपनी टेलिकॉम सेक्टरमध्ये जिओला जोरदार टक्कर देत आहे. जिओने टेलिकॉम सेक्टरमध्ये प्रवेश केल्यापासून या क्षेत्रातील आर्थिक स्थिती पूर्णपणे बदलली आहे. कंपनीने कॉलिंग मोफत केले होते. तसेच, खूपच कमी किंमतीत डेटा देखील उपलब्ध केला आहे. जिओच्या या पावलामुळे टेलिकॉम कंपन्यांना मोठी टक्कर मिळत आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने AGR बाबत निर्णय दिल्याने एअरटेलवर आर्थिक दबाव आहे. या सर्व गोष्टींमुळे गुगलसोबत करार झाल्यास एअरटेलसाठी नक्कीच फायद्याचे ठरू शकते. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BlSZQg
Comments
Post a Comment