ठरलं! या तारखेला लाँच होणार बहुप्रतिक्षित iPhone १३ सीरिज, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : च्या लाँचिंगची वाट पाहणाऱ्यांसाठीआनंदाची बातमी आहे. रिपोर्टनुसार, बहुप्रतिक्षित सीरिज १७ सप्टेंबरला लाँच होण्याची शक्यता आहे. यासोबतच, नवीन ला ३० सप्टेंबरला लाँच केले जाईल. माइक्रोब्लॉगिंग वेबसाइट वर एका टिपस्टरने याबाबतची माहिती दिली आहे. टिपस्टरने ४ मॉडेलचे स्क्रीनशॉट शेअर केले होते. यामध्ये आयफोन १३, आयफोन १३ प्रो, आयफोन १३ प्रो मॅक्स आणि आयफोन १३ मिनीचा समावेश आहे. तसेच, AirPods ला AirPods 3 म्हणून लिस्टेड करण्यात आले आहे. मात्र, यांचे फायनल मार्केटिंग नाव काय असेल हे स्पष्ट झालेले नाही. वाचा: iPhone 12 सीरिज उशिरा झाली होती लाँच याआधी समोर आलेल्या रिपोर्टमध्ये आयफोन १३ सीरिज सप्टेंबरमध्ये लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात आले होते. नवीन सीरिज सर्वसाधारणपणे सप्टेंबर महिन्यात लाँच होते. मात्र, आयफोन १२ सीरिजच्या लाँचिंगला करोना महामारीमुळे उशीर झाला होता. आता टिपस्टर पांडाद्वारे शेअर करण्यात आलेल्या स्क्रीनशॉटनुसार, आयफोन १३ सीरिजला १७ सप्टेंबरला लाँच केले जाईल. या स्क्रीनशॉटमध्ये आयफोन १३, आयफोन १३ प्रो, आयफोन १३ प्रो मॅक्स आणि आयफोन १३ मिनीचा समावेश आहे. आयफोन १३ मॉडेल विना कव्हरचे दिसत आहे. यात ड्यूल रियर कॅमेऱ्यासह सनसेट गोल्ड कलर दिसत आहे. फ्रंटला एक नॉच देखील आहे. स्क्रीनशॉटमध्ये AirPods 3 ३० सप्टेंबरला लाँच होण्याची शक्यता देखील आहे. हे वॉटर रेसिस्टेंटसाठी आयपीएक्स४ रेटिंगसह येतील. या व्यतिरिक्त आयफोन १३ सीरिज आणि एअरपॉड्सबद्दल कोणतीही अन्य माहिती उपलब्ध झालेली नाही. आयफोन १३ सीरिजमध्ये मोठी बॅटरी आणि ५जी सपोर्ट मिळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. तसेच, सीरिजला कंपोनेंट्सचा कमतरतेचा सामना करावा लागू शकतो. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DjfBTf

Comments

clue frame