बंपर नोकऱ्या!, iPhone 13 मुळे २ लाख जणांना मिळणार रोजगार, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः iPhone 13 मुळे लाखो लोकांना रोजगार मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. आयफोन १३ प्रोडक्शनसाठी फोक्सकॉ़न २ लाख आणखी कर्मचाऱ्यांना कामावर ठेवणार आहे. एका नुकत्याच रिपोर्टमधून हा दावा करण्यात आला आहे की, अॅपल सप्लायर आणि जगातील सर्वात मोठी कॉन्ट्रॅक्ट इलेक्ट्रॉनिक्स मॅन्यूफॅक्चरिंग फोक्सकॉन सप्टेंबरच्या अखेरपर्यंत नवीन "iPhone 13" लाइनअपच्या निर्माणासाठी २ लाख आणखी कर्मचाऱ्यांना कामावर ठेवणार आहे. २ लाख कर्मचाऱ्यांची गरज साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या माहितीनुसार, पुढील महिन्यात आयफोन १३ लाइनअपच्या अपेक्षित चीनी शहर झेंग्झो मध्ये फोक्सकॉनच्या आयफोन कारखान्यात २ लाख अतिरिक्त कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. फोक्सकॉनच्या झेंग्झो प्लांटचे महाप्रबंधक वांग झू यांनी म्हटले की, स्टाफिंग कर्चमारी कंपनीसाठी सर्वात मोठी समस्या बनली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबरच्या अखेरपर्यंत भरती करून २ लाख जणांना रोजगार दिला जाईल. झेंग्झो फॅसिलिटी जगातील सर्वात मोठी आयफोन फॅक्ट्री आहे. ज्यात ३ लाख ५० हजार असेंबली लाइनचे कर्मचारी आहेत. यात रोज ५ लाख नवीन आयफोनची निर्मिती केली जाते. नवीन आयफोन १३ मॉडल्समध्ये असू शकतात हे खास फीचर्स रिपोर्टच्या माहितीनुसार, iPhone 13 लाइनअप मध्ये ५.४ इंचाचा iPhone 13 Mini, 6.1-इंच iPhone 13, 6.1-इंच iPhone 13 Pro आणि 6.7-इंच iPhone 13 Pro Max जोडले जावू शकतात. आयफोन १३ प्रो मॉडल मध्ये वाय फाय ६ई असू शकतो. वाय फाय ६ई हायर परफॉर्मन्स, लो लेटेंसी आणि वेगवान डेटा रेट्स सह वाय फाय ६ सुविधा आणि क्षमता देते. अपकमिंग सीरीज 25W फास्ट-जनरेशन टेक्नोलॉजीचा सपोर्ट करेल. आयफोनची सध्याची यूएसबी सी पॉवर एडाप्टर फक्त २० वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट करते. वाचा: वाचा: वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yoA9pw

Comments

clue frame