स्मार्टफोन खरेदीत बजेटची अडचण ! Free मध्ये घरी आणा आवडीचा स्मार्टफोन, 'या' युर्जसना मिळणार लाभ, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: जर तुम्ही तुमच्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला बजेटची अडचण असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे . लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट ने युजर्ससाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे, ज्या अंतर्गत यूजर्सना मोफत स्मार्टफोन मिळण्याची संधी आहे. वाचा: या ऑफरचे नाव आहे Flipkart Phone for Free . फ्लिपकार्टच्या नवीन मोहिमेअंतर्गत युजर्ना कोणत्याही नवीन स्मार्टफोनच्या खरेदीवर १०० % कॅशबॅक जिंकण्याची संधी मिळत आहे. फ्लिपकार्ट अॅप आणि मोबाईल वेबसाइट वापरणाऱ्यांसाठीच हे लागू आहे. हे कॅम्पेन २८ ऑगस्ट २०२१ ते ३१ ऑगस्ट २०२१ च्या मध्यरात्रीपर्यंत सुरु राहणार आहे. जाणून घेऊया ऑफर बद्दल. Flipkart Phone for Free : Flipkart मोहिमेअंतर्गत, मोबाईल फोन खरेदी करणारे १०० ग्राहक १०० % कॅशबॅक जिंकण्याची संधी मिळवू शकतात. यासाठी, विक्री दरम्यान दररोज २५ ग्राहकांची निवड केली जाईल. उल्लेखनीय म्हणजे, ई-कॉमर्स पोर्टलवरील प्रत्येक १००० व्या ग्राहकाची निवड १०० ग्राहक पूर्ण होतपर्यंत केली जाईल. Flipkart Phone for Free ऑफर डिटेल्स Flipkart Phone for Free ऑफर २८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजता लाईव्ह झाली आहे. या अंतर्गत, २५ भाग्यवान फ्लिपकार्ट ग्राहक जे दररोज स्मार्टफोन खरेदी करतात त्यांना त्यांच्या खरेदीची संपूर्ण रक्कम मिळण्याचा हक्क असेल. ही रक्कम फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक गिफ्ट व्हाउचर म्हणून जमा केली जाईल. ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना फ्लिपकार्टच्या माध्यमातून त्यांच्या आवडीचा स्मार्टफोन खरेदी करावा लागेल. हे २५ विजेते दिवसाचे १०००, २००० इत्यादी स्वरूपात निवडले जातील. फ्लिपकार्ट मोबाईल श्रेणीच्या लँडिंग पेजवर १४ सप्टेंबर २०२१ रोजी विजेत्यांची घोषणा केली जाईल. याशिवाय, निवडलेल्या विजेत्यांना त्यांचे फ्लिपकार्ट गिफ्ट व्हाउचर २५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत दिले जातील. हे ग्राहकाने खरेदी केलेल्या स्मार्टफोनच्या रकमे इतके आणि स्मार्टफोनच्या किंमतीचे १०० % कॅशबॅक असेल. मोफत फ्लिपकार्ट फोनसाठी हे आहे आवश्यक: नियम आणि अटींनुसार, जे ग्राहक फ्लिपकार्ट फोन विनामूल्य ऑफर अंतर्गत या ऑफरचा लाभ घेऊ शकतात त्यांचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे. तसेच, त्यांचे वैध फ्लिपकार्ट खाते असावे. जर ग्राहकाने विक्री कालावधीत अनेक स्मार्टफोन खरेदी केले असतील, तर ग्राहकाने केलेली पहिलीच खरेदी फ्लिपकार्ट फोन विनामूल्य विचारात घेतली जाईल. केवळ वितरित ऑर्डरसाठी व्हाउचरसाठी पात्र असतील. परत केलेले ऑर्डर्स विचारात घेतले जाणार नाही. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gMiqCz

Comments

clue frame