Disney+ Hotstar च्या प्लान्समध्ये मोठा बदल, उद्यापासून मोजावे लागणार अधिक पैसे

नवी दिल्ली : करोनामुळे लोकांना बाहेर पडताना येत नसल्याने अधिक वेळ घरातच जात आहे. अशाट ओटीटी फ्लॅटफॉर्म्सची मागणी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनी वेगवेगळे प्लान्स आहेत. तुम्ही जर Disney+ Hotstar वापरत असाल तर कंपनीने आपल्या प्लान्समध्ये काही बदल केले आहेत. कंपनीने जुलै महिन्यात नवीन प्लान आणि सबस्क्रिप्शनची माहिती दिली होती. १ सप्टेंबरपासून हे प्लान लागू होतील. वाचा: हे नवीन प्लान्स नवीन व आधीच्या यूजर्सला लागू असतील. या प्लान्सची किंमत यूजर्सची संख्या आणि स्ट्रीमिंग क्वालिटीवर आधारित असेल. तुम्ही जर आधीपासून प्लान वापरत असाल तर तुमची वैधता समाप्त होईपर्यंत आधीच्या प्लान्सप्रमाणेच फायदे मिळतील. कंपनीचे नवीन प्लान्स ४९९ रुपयांपासून सुरू होतात. याची किंमत १,४९९ रुपयांपर्यंत जाते. जुन्या यूजर्सला देखील कॉन्टेंटमधील फरक पाहायला मिळेल. याआधी प्रीमियम सबस्क्रिप्शन असल्यावरच Disney+ Originals, चे टीव्ही शो, , स्टार वॉर्स, नॅशनल जिओग्राफी, , एफक्स, शो टाइम आणि सर्चलाइट पिक्चर्सचा देखील कॉन्टेंट पाहायला मिळत असे. मात्र, आता नवीन प्लान्समध्ये सर्वांनाच हा कॉन्टेंट पाहता येईल. ४९९ रुपयांचा प्लान ४९९ रुपयांच्या प्लानमध्ये स्ट्रीमिंग क्वालिटी एचडी असेल. याशिवाय केवळ मोबाइल स्क्रीनवर याचा वापर करता येईल. हा प्लान नेटफ्लिक्सप्रमाणे काम करेल. ८९९ रुपयांचा प्लान ज्यांना टीव्हीवर डिज्नी+ हॉटस्टार पाहायची सवय आहे त्यांच्यासाठी हा प्लान पफेक्ट आहे. या प्लानमध्ये दोन डिव्हाइसवर एचडी कॉन्टेंट स्ट्रीमिंगचा फायदा मिळेल. टॅबलेट, टीव्ही आणि मोबाइल स्क्रीनवर अ‍ॅक्सेस करता येईल. १,४९९ रुपयांचा प्लान तुम्हाला जर ४के कॉन्टेंट पाहायचा असेल तर आधीच्या प्लानच्या तुलनेत हे मोठे अपग्रेड आहे. यात यूजर्स ४ डिव्हाइसवर कॉन्टेंट स्ट्रीम करू शकतील. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WDb5xY

Comments

clue frame