'मेड इन इंडिया' कंपनी Bluei ने लाँच केले ४० वॉटचे होम थिएटर, रिमोटने करू शकाल कंट्रोल

नवी दिल्लीः देशी कंपनी ने बाजारात आपले ४० वॉटचे होम थिएटर लाँच केले आहे. Bluei ने या स्पीकर सोबत रिमोट कंट्रोल मिळणार आहे. तसेच एक एलईडी डिस्प्ले सुद्धा मिळणार आहे. Bluei ने या स्पीकर सोबत कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ ५.० चे सपोर्ट दिले आहे. यात युजर्सची सुविधेसाठी बटन दिले आहे. याच्या मदतीने व्हॅल्यूम कंट्रोल होणार आहे. Bluei ने याला होम थिएटर सोबत ३डी स्टिरियो सपोर्ट आहे. या स्पीकरच्या कनेक्टिविटी रेंज १५ मीटर आहे. सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे या स्पीकर मध्ये एफएम रेडिओ दिला आहे. यासोबत अँटिना दिला आहे. यात सबवूफर आहे. यासाठी वेगळे एक बटन दिले आहे. यासोबत एयूएक्स आणि माईक इनपूट शिवाय, यूएसबी इनपूट दिले आहे. या स्पीकरला तुम्ही मोबाइल, लॅपटॉप, कंप्यूटर किंवा प्लेस्टेशनने कनेक्ट करू शकता. Bluei मॉन्सटर थिएटरची किंमत ३ हजार ४९९ रुपये आहे. याची विक्री ब्लॅक कलर व्हेरियंटमधून वेगवेगळ्या रिटेल स्टोरवरून केली जाणार आहे. Bluei एक भारतीय कंपनी आहे. या कंपनीची सुरुवात २००९ मध्ये झाली होती. कंपनीकडे हेडफोन, पॉवरबँक, चार्जर यासारखे प्रोडक्ट्स आहेत. याआधी यावर्षाच्या सुरुवातीला कंपनीने एकत्र अनेक ब्लूटूथ स्पीकर लाँच केले होते. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sZ6H8w

Comments

clue frame