भारतात एक तास ठप्प राहिल्यानंतर ट्विटरची सेवा पुन्हा सुरू

नवी दिल्लीः मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरची सेवा भारतात आज सकाळी एक तास ठप्प झाली होती. युजर्संन या दरम्यान ट्विटरमध्ये लॉग इन करण्यात अडचण येत होती. डाउनडिटेक्टरच्या माहितीनुसार, जवळपास ४५३ युजर्सने ट्विटर ठप्प होण्याची तक्रार नोंदवली होती. परंतु, आता ट्विटरची सेवा पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरू झाली आहे. डाउनडिटेक्टर वर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, जवळपास ४५३ युजर्संनी शनिवारी सकाळी ९ ते १० पर्यंत भारतात ट्विटरवर येत असलेल्या समस्येची माहिती दिली होती. याशिवाय, ७० टक्के तक्रारीची ट्विटर वेबसाइटसाठी नोंद करण्यात आली होती. ट्विटरची सेवा याआधी एप्रिल मध्ये ठप्प झाली होती. त्या दरम्यान ४० हजार युजर्संवर परिणाम झाला होता. काही वेळेनंतर ट्विटरची सेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली होती. कंपनीच्या म्हणण्यानुसार, आम्ही प्लॅटफॉर्मला ठीक केले आहे. युजर्सं पुन्हा एकदा व्यवस्थितपणे ट्विट करू शकतात. ट्विटरवर लवकरच येणार आहे हे खास फीचर ट्विटर आपल्या युजर्ससाठी प्लॅटफॉर्मवर लवकरच एक खास फीचर जोडणार आहे. या फीचर द्वारे या नवीन फीचरमुळे युजर्संना व्हिडिओ पाहायला सोपे होणार आहे. ट्विटरच्या या नवीन फीचरची टेस्टिंग सध्या अमेरिका, जपान, कॅनडा, आणि सऊदी अरब मध्ये केली जात आहे. या फीचरचा वापर आयओएस युजर्स करू शकतील. हे फीचर लवकरच अँड्रॉयड युजर्ससाठी उपलब्ध केले जाणार आहे. ट्विटरचे प्रवक्ते यांनी सांगितले की, आम्ही नवीन फीचरची टेस्टिंग चार आठवड्या पर्यंत करू शकतील. या आधारावर फीचरची लाँचिंग संबंधित निर्णय झाला आहे. याशिवाय, याची जास्त माहिती मिळाली नाही. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Y96qot

Comments

clue frame