रोज ४ रुपयांपेक्षा कमी खर्चात ८४ दिवसाच्या वैधतेचे जिओचे प्लान, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ () कडे १४ दिवसापासून ३६५ दिवसांपर्यंतचे रिचार्ज प्लान आहेत. यात तुम्ही कोणताही प्लान रिचार्ज करू शकता. जर तुम्हाला ३ महिने म्हणजेच ८४ दिवसांपर्यंत चालणारा प्लान हवा असेल तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी अशा प्लानची माहिती देत आहोत. जिओचा ८४ दिवसाच्या वैधतेच्या प्लानमध्ये रोज ४ रुपयांपेक्षा कमी खर्चात तुम्हाला चांगले बेनिफिट मिळू शकतात. जाणून घ्या डिटेल्स. रोज ४ रुपयांपेक्षा कमी खर्चात ८४ दिवसाची वैधता रिलायन्स जिओचा व्हॅल्यू प्लान्स पैकी एक रिचार्ज ३२९ रुपयाचा प्लान आहे. या प्लानची वैधता ८४ दिवसाची आहे. या प्लानमध्ये रोजचा खर्च ३.९१ रुपये आहे. प्लानमध्ये युजर्संना ६ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. प्लानमध्ये १००० एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते. सोबत जिओचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. ८४ दिवसाची वैधता, २५२ जीबी डेटा रिलायन्स जिओचा एक प्लान ९९९ रुपयाचा आहे. या प्लानची वैधता ८४ दिवसाची आहे. प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच या प्लानमध्ये एकूण २५२ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंग सोबत रोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते. याशिवाय, जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. ८४ दिवसाची वैधता, १३१ जीबी पर्यंत डेटा रिलायन्स जिओचा ५५५ रुपये आणि ७७७ रुपयाच्या रिचार्ज प्लानमध्ये ८४ दिवसाची वैधता मिळते. या दोन्ही प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. या दोन्ही प्लानमध्ये रोज १०० SMS पाठवण्याची सुविधा मिळते. ५५५ रुपयाच्या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये एकूण १२६ जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच या प्लानमध्ये एकूण १२६ जीबी डेटा दिला जातो. तर ७७७ रुपयाच्या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये एकूण १३१ जीबी डेटा मिळतो. ७७७ रुपयाच्या प्लानमध्ये Disney+ Hotstar चे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. ८४ दिवसाची वैधता, १६८ जीबी डेटा रिलायन्स जिओकडे ८४ दिवसाची वैधते सोबत येणारा आणखी एक प्लान आहे. हा प्लान ५९९ रुपयाचा आहे. या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच या प्लानमध्ये एकूण १६८ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. रोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते. जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BqK67V

Comments

clue frame