नवी दिल्ली : गेल्या अनेक महिन्यांपासून स्मार्टफोनच्या किंमती सतत वाढत आहेत. त्याचबरोबर, पुन्हा एकदा Xiaomi, Realme आणि Poco ने अनेक स्मार्टफोनच्या किंमती वाढवल्या आहेत. शाओमीने यापूर्वी ची किंमत अनेक वेळा वाढवली आहे. कंपनीने त्याची किंमत ५०० रुपयांनी वाढवली आहे. एकूणच,Redmi Note 10 लाँच झाल्यापासून आता या फोनच्या किंमतीत २००० रुपयांची वाढ झाली आहे. स्मार्टफोनच्या किंमती वाढवण्याच्या शर्यतीत पोकोही मागे नाही. कंपनीने आपल्या ची किंमत ५०० रुपयांनी ने वाढवली आहे.तर, दुसरीकडे, Realme ने आपल्या पाच स्मार्टफोनच्या किंमतीत एकाचवेळी वाढ करण्याची घोषणा केली आहे. वाचा: तुम्हाला Redmi Note 10 च्या या फोनच्या ४GB रॅम व्हेरिएंटसाठी १३,९९९ रुपये द्यावे लागतील. ६ GB रॅम व्हेरिएंटची किंमत अजूनही,१५,४९९ आहे.६GB रॅम आणि ६४ GB स्टोरेज असलेल्या Redmi Note 10S च्या बेस व्हर्जनची किंमत १४,९९९ रुपयांपासून सुरू होते POCO बद्दल बोलायचे झाले तर ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज ऑप्शन असलेला POCO 3 फोन १०,९९९ रुपयांचा रुपये झाला आहे. दुसरीकडे, ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजसह मिड-टियर व्हेरिएंटची किंमत ११,९९९ रुपये आहे. Realme बद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने आपल्या अनेक फोनच्या किंमती वाढवल्या आहेत, ज्यात Realme ८ मालिका आणि Realme C मालिका समाविष्ट आहेत. भारतात Realme C11 (2021), Realme C21 आणि Realme C25s ची किंमत भारतात १५०० रुपयांपर्यंत पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याच वेळी, Realme C21 (2021) च्या किंमतीत ३०० रुपयांनी वाढ झाली आहे, तर Realme C21 आणि Realme C25s आता ₹५०० अधिक विकत आहेत. आता भारतात Realme 8 च्या ४GB RAM + १२८GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १४,४९९ रुपयांऐवजी १५,९९९ रुपयांपासून सुरू होते. Realme 8 च्या ६GB + १२८GB पर्यायाची किंमत देखील १५,४९९ रुपयांवरून १६,९९९ रुपये करण्यात आली आहे. शिवाय, Realme 8 चे ८GB + १२८GB वेरिएंट आता १६,४९९ रुपयांऐवजी १७,९९९ रुपयांना विकले जात आहे. त्याचप्रमाणे Realme 8 5G च्या किंमतीतही १५०० रुपयांची ची वाढ करण्यात आली आहे. ४ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेजसह १३,९९९ रूपयांची किंमत आता १५,९९९ रुपये आहे. Realme C11 (2021) च्या २ GB + ३२ GB व्हेरिएंटची किंमत देखील वाढली आहे.ते आता ७२९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हे पूर्वी ६,९९९ मध्ये उपलब्ध होते. या व्यतिरिक्त, Realme C21 आणि Realme C25s मध्ये देखील ५०० रुपयांची वाढ झाली आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BqkSqi
Comments
Post a Comment