नवी दिल्ली : रिलायन्स जिओने काही महिन्यांपूर्वी नवीन सादर केला होता. यामध्ये नवीन डिझाइन आणि काही नवीन फीचर्स दिले होते. कंपनी या फोनच्या खरेदीवर काही स्पेशल ऑफर्स देत आहे. या ऑफर अंतर्गत तीन वेगवेगळे प्लान्स येतात. विशेष म्हणजे यासोबत मोफत मिळेल. या प्लान्सची किंमत १,९९९ रुपये, १,४९९ रुपये आणि ७४९ रुपये आहे. १,९९९ रुपयांच्या प्लानमध्ये जिओफोनसोबत २ वर्षांची वैधता देखील मिळते. वाचा: १,९९९ रुपयांचा जिओफोन प्लान १,९९९ रुपयांच्या प्लानमध्ये जिओफोन आणि २ वर्षांची अलिमिटेड कॉलिंग, डेटा प्लान मिळेल. म्हणजेच एका फोन घेतल्यानंतर २ वर्ष रिचार्ज करण्याची गरज नाही. या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, महिन्याला २ जीबी डेटा मिळेल. डेटा समाप्त झाल्यानंतर ६४ Kbps स्पीड मिळेल. १,४९९ रुपयांचा जिओफोन प्लान १,४९९ रुपयांचा एक वर्षाच्या वैधतेसह येतो. एकदा फोन घेतल्यानंतर तुम्हाला १ वर्षासाठी रिचार्ज करण्याची गरज नाही. प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, महिन्याला २ जीबी डेटा मिळेल. डेटा समाप्त झाल्यानंतर ६४ Kbps स्पीड मिळेल. ७४९ रुपयांचा जिओफोन प्लान कंपनीकडे ७४९ रुपयांचा आणखी एक प्लान आहे, ज्यात जिओफोन मोफत मिळतो. हा प्लान आधीपासूनच जिओफोन वापरणाऱ्या यूजर्ससाठी आहे. या प्लान्समधील देखील १,४९९ रुपयांच्या प्लान्समध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा मिळतात. यात वर्षभरासाठी सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, महिन्याला २ जीबी डेटा मिळेल. डेटा समाप्त झाल्यानंतर ६४ Kbps स्पीड मिळेल. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sS5cJk
Comments
Post a Comment