नवी दिल्लीः ला ई-कॉमर्स साइट अमेझॉनवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. यासाठी अमेझॉनवर एक कूपन अप्लाय करावे लागेल. १० हजार रुपयाचे हे कूपन सर्वांसाठी उपलब्ध आहे. यामुळे या फोनची किंमत खूपच कमी झाली असून फोनला स्वस्तात खरेदी करता येवू शकते. Xiaomi Mi 10 वर हा डिस्काउंट कधी पर्यंत दिला जाणार आहे, हे अद्याप स्पष्ट नाही. शाओमीचा हा फ्लॅगशीप स्मार्टफोन आहे. जर तुम्हाला हा Xiaomi Mi 10 फ्लॅगशीप स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर एक चांगली संधी आहे. Xiaomi Mi 10 चा स्मार्टफोन डिस्काउंट सोबत ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजवर दिला जात आहे. हा कोरल ग्रीन ऑप्शन मध्ये येतो. याला कूपन डिस्काउंट सोबत १० हजार रुपयाची सूट मिळवता येवू शकते. कूपन डिस्काउंट नंतर या फोनला ४४ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. या फोनची ओरिजनल किंमत ५४ हजार ९९९ रुपये आहे. या फोनमध्ये पॉवरफुल प्रोसेसर दिले गेले आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर दिले आहे. यासोबत ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी पर्यंत स्टोरेज दिले आहे. Xiaomi Mi 10 च्या रियर मध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा १०८ मेगापिक्सलचा दिला आहे. यासोबत या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. या फोनला पॉवर देण्यासाठी यात ४७८० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. ३० वॉट वायरलेस वायर्ड चार्जिंग सपोर्ट दिला आहे. या फोनवर कूपन डिस्काउंट शिवाय, १७ हजार ६०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zFo8NS
Comments
Post a Comment