फ्री ऑनलाइन मुव्ही, सीरीज आणि म्युझिकचा आनंद घ्या ! Airtel च्या या रिचार्ज प्लान्समध्ये OTT बेनिफिट्स आणि बंपर डेटा,पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: Airtel ने आपल्या डेटा प्रीपेड प्लान्सचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला आहे. या डेटा पॅकचा वापर करून, युजर्स त्यांच्या अनलिमिटेड प्लान्सवर अतिरिक्त डेटा मिळवू शकतात. पूर्वी, Airtel कडे फक्त एक डेटा प्लॅन होता ज्याने युजर्सना डिस्ने + हॉटस्टार व्हीआयपी फायदे दिले. अलीकडेच Airtel ने नवीन प्रीपेड डेटा प्लान जोडले आहेत जे Wynk Music Premium आणि Amazon Prime Video Mobile Edition सारख्या फायद्यांसह सुसज्ज आहेत. नेटवर्क प्रदाता कंपनीने ऑफर केलेल्या या तीन योजनांमध्ये OTT लाभ उपलब्ध आहेत. वाचा: Airtel चा ४०१ रुपयांचा प्लान: Airtel च्या ४०१ रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना ३० GB डेटा मिळतो. डेटा पूर्ण झाल्यानंतर इंटरनेट ५० पैसे प्रति एमबी आकारले जाते. वैधतेबद्दल बोलायचे झाले तर या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. इतर फायद्यांविषयी बोलायचे तर या प्लानमध्ये डिस्ने + हॉटस्टार व्हीआयपी सदस्यता उपलब्ध आहे. Airtel चा २५८ रुपयांचा प्लान: Airtel च्या २५८ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्सना २५ जीबी डेटा मिळतो. डेटा कोटा पूर्ण झाल्यानंतर इंटरनेट ५० पैसे प्रति एमबी आकारले जाते. वैधतेबद्दल बोलायचे झाले तर या प्लानची वैधता सध्याच्या प्लान सारखीच आहे. इतर फायद्यांविषयी सांगायचे तर, Wynk Music Premium सबस्क्रिप्शन १ वर्षासाठी या प्लानमध्ये उपलब्ध आहे. Airtel चा ७८ रुपयांचा प्लान: Airtel च्या ७८ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्सना ५ GB डेटा मिळतो. डेटा कोटा पूर्ण झाल्यानंतर इंटरनेट ५० पैसे प्रति एमबी आकारले जाते. वैधतेबद्दल बोलायचे झाले तर या प्लानची वैधता सध्याच्या प्लॅनइतकीच आहे. इतर फायद्यांविषयी सांगायचे त, Wynk Music Premium सबस्क्रिप्शन ३० दिवसांसाठी या प्लानमध्ये उपलब्ध आहे. Airtel चा ८९ रुपयांचा प्लान: Airtel च्या ८९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्सना ६ GB जीबी डेटा मिळतो. डेटा कोटा पूर्ण झाल्यानंतर इंटरनेट ५० पैसे प्रति एमबी आकारले जाते. या प्लानची वैधता सध्याच्या प्लॅनइतकीच आहे. इतर हा प्लान Amazon प्राइम व्हिडिओ मोबाईल एडिशन, फ्री हेलोट्यून्स, विंक म्युझिक फ्री आणि एअरटेल एक्सस्ट्रीममध्ये प्रवेश देतो. Airtel चा १३१ रुपयांचा प्लान: Airtel च्या १३१ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्सना १०० GB डेटा मिळतो. डेटा कोटा पूर्ण झाल्यानंतर इंटरनेट ५० पैसे प्रति एमबी आकारले जाते. वैधतेबद्दल बोलायचे झाले तर या प्लानची वैधता सध्याच्या प्लॅनइतकीच आहे. इतर फायद्यांविषयी बोलायचे त, हा प्लॅन Amazon प्राइम व्हिडिओ मोबाईल एडिशन, फ्री हेलोट्यून्स, विंक म्युझिक फ्री आणि एअरटेल एक्सस्ट्रीममध्ये प्रवेश देतो. Airtel चे इतर डेटा पॅक, Airtel चा ४८ रुपयांचा प्लान: Airtel च्या ४८ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्सला ३ GB डेटा मिळतो. डेटा कोटा पूर्ण झाल्यानंतर इंटरनेट ५० पैसे प्रति एमबी आकारले जाते. वैधतेबद्दल बोलायचे झाले तर या प्लानची वैधता सध्याच्या प्लॅनइतकीच आहे. Airtel चा ९८ रुपयांचा प्लान: Airtel च्या ९८ रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सना १२ जीबी डेटा मिळतो. डेटा कोटा पूर्ण झाल्यानंतर इंटरनेट ५० पैसे प्रति एमबी आकारले जाते. वैधतेबद्दल बोलायचे झाले तर या प्लानची वैधता सध्याच्या प्लान इतकीच आहे. Airtel चा २५१ रुपयांचा प्लान: Airtel च्या २५१ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्सना ५० जीबी डेटा मिळतो. डेटा कोटा पूर्ण झाल्यानंतर इंटरनेट ५० पैसे प्रति एमबी आकारले जाते. वैधतेबद्दल बोलायचे झाले तर या प्लानची वैधता सध्याच्या प्लान इतकीच आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DAocAU

Comments

clue frame