देशातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोनला आणखी स्वस्तात खरेदीची संधी, पाहा नवी किंमत

नवी दिल्लीः देशातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन वर डिस्काउंट दिला जात आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनवर ५०० रुपयांची अतिरिक्त सूट दिली जात आहे. या स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. तर याच्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. तसेच ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. ही ऑफर २८ ऑगस्ट पर्यंत वैध आहे. Realme 8 5G चे स्पेसिफिकेशंस Realme 8 5G मध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी पल्स डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन 2400x1080 पिक्सल दिला आहे. हा फोन डायमेंसिंटी 700 5G प्रोसेसर सोबत येतो. हा फोन अँड्रॉयड ११ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यात ३ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेज दिले आहे. कॅमेरा आणि बॅटरी फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे .याचा प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा आहे. या फोनमध्ये ५ नाइट स्केप फिल्टर दिले आहे. फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर दिले आहे. फोनमध्ये पॉवर साठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. जी 18W फास्ट चार्जर सोबत येते. Samsung Galaxy M42 5G शी होणार टक्कर Realme 8 5G ची टक्कर Samsung Galaxy M42 5G शी होणार आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर दिला आहे. सॅमसंगचा पहिला स्मार्टफोन आहे. Samsung Galaxy M42 5G फोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टम वर काम करतो. फोनमध्ये १२८ जीबी पर्यंत स्टोरेज आणि ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे .या फोनमध्ये पॉवर साठी 6000mAh ची बॅटरी दिली आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gzFBju

Comments

clue frame