108MP कॅमेऱ्याचा Mi 10i स्मार्टफोनला स्वस्तात खरेदीची संधी, बंपर डिस्काउंट सोबत मिळेल १४ हजाराची एक्सचेंज ऑफर

नवी दिल्लीः शाओमी (Xiaomi)च्या अधिकृत वेबसाइटवर सुरू असलेला एमआय फ्लॅगशीप डे सेल (Mi Flagship Day) चा आज अखेरचा दिवस आहे. या सेलमध्ये कंपनी जबरदस्त स्मार्टफोन मी १० आय (Mi 10i) उपलब्ध आहे. या फोनवर बंपर डिस्काउंट पासून कॅशबॅक पर्यंत दिला जात आहे. Mi 10i स्मार्टफोनमध्ये 108MP चा मेन कॅमेरा दिला आहे. या फोनचे हे खास वैशिष्ट्ये आहे. याशिवाय, या फोनमध्ये 4820mAh ची बॅटरी आणि एफएचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. Mi 10i ची किंमत Mi 10i स्मार्टफोनला भारतीय बाजारात ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंट मध्ये उपलब्ध केले आहे. या फोनची किंमत अनुक्रमे २१ हजार ९९९ रुपये आणि २३ हजार ९९९ रुपये आहे. या फोनला एटलांटिक ब्लू, मिडनाइट ब्लॅक, आणि पॅसिफिक सनराइज कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केले आहे. Mi 10i वर मिळणारी ऑफर Mi 10i वर मिळणारी ऑफर पाहिल्यास SBI च्या क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास १५०० रुपयाचा डिस्काउंट दिला जात आहे. यासोबतच MobiKwik वरून खरेदी केल्यास ६०० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. याशिवाय, स्मार्टफोनला १४ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट EMI वर खरेदी केले जावू शकते. Mi 10i चे स्पेसिफिकेशन Mi 10i 5G स्मार्टफोन मध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन 1,080x2,400 पिक्सल आहे. याच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिला ग्लास ५ चा वापर केला आहे. या फोनमध्ये Snapdragon 750G प्रोसेसर दिला आहे. हा फोन MIUI 12 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. Mi 10i 5G स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी सेन्सर 108MP चा आहे. तर दुसरा 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल आणि तिसरा 2MP चा मायक्रो आणि चौथा 2MP चा डेप्थ सेन्सर दिला आहे. याशिवाय, फोनमध्ये सेल्फीसाठी 16MP चा कॅमेरा मिळेल. Mi 10i 5G स्मार्टफोन 4,820mAh ची बॅटरी सोबत ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. याशिवाय, या हँडसेट मध्ये 5G, यूएसबी टाइप-सी पोर्ट, वाय-फाय, 3.5mm ऑडियो जॅक आणि ब्लूटूथ मिळेल. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WuYXyR

Comments

clue frame