Xiaomi ला भारतात पुन्हा 'अच्छे दिन', बनले नंबर वन स्मार्टफोन ब्रँड, 'या' फोनची सर्वात जास्त झाली विक्री
नवी दिल्लीः भारतात शाओमीने आपले स्थान कायम ठेवले आहे. यावर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत शाओमी भारतातील नंबर वन स्मार्टफोन कंपनी बनली आहे. याचे २८ टक्के मार्केट शेयर होते. यानंतर सॅमसंग, विवो, रियलमी आणि ओप्पोचा नंबर येतो. शाओमीला नंबर वन बनवण्यासाठी रेडमी ९ सीरीज आणि रेडमी १० सीरीजचा खूप मोठा वाटा आहे. तर गॅलेक्सी एम सीरीज आणि एफ सीरीज सॅमसंगला मार्केट मध्ये तिसरे स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले. भारतीय स्मार्टफोनचे शिपमेंट्स ८२ टक्के ईयर ऑन ईयर वाढून ३३ मिलियन युनिट्स पर्यंत २०२१ दुसऱ्या तिमाहिती पोहोचले आहे. वाचाः यावरून काउंटर पॉइंटच्या मार्केट मॉनिटर सर्विसने रिपोर्ट केले आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव पडल्याचे पाहायला मिळाले आहे. मार्केट १३ टक्के घसरले आहे. यात ऑनलाइन ब्रँड हून जास्त ऑफलाइन सेंट्रिक ब्रँडवर परिणाम झाला आहे. परंतु, ही घसरण कमी आहे. ही डिमांड जून मध्ये पुन्हा एकदा वाढली आहे. यात शाओमीची ग्रोथ रेडमी ९ सीरीज, आणि रेडमी १० सीरीज मुळे जास्त राहिली आहे. टॉप ५ मॉडल मध्ये शाओमीने पहिल्या चारवर कब्जा केला आहे. यात Redmi 9A, Redmi 9 Power, Redmi Note 10 आणि Redmi 9 चा समावेश आहे. वाचाः रेडमी ९ ए गेल्या तीन तिमाहितपासून सर्वात जास्त विकणारा स्मार्टफोन आहे. शाओमी या क्वॉर्टर मध्ये प्रीमियम आणि अल्ट्रा प्रीमियम कॅटेगरीत यशस्वी ठरला आहे. शाओमीला वाढण्यासाठी पोकोची मदत मिळाली आहे. पोकोने अनेक स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. यात Poco M3 आणि Poco X3 Pro स्मार्टफोन ने खूपच मदत केली आहे. भारतात ५० मिलियन स्मार्टफोन शिपमेंटची आकडेवारी पार केली आहे. त्यात रियलमी कंपनीला यश आले आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3l7VUHl
Comments
Post a Comment