बंद होणार WhatsApp Web सेवा ? वाचा कंपनी काय म्हणाली

नवी दिल्ली : इंस्टंट WhatsApp आपल्या यूजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असते. लवकरच मल्टी डिव्हाइस सपोर्ट फीचर देखील अ‍ॅपसाठी उपलब्ध होणार आहे. सध्या हे फीचर बीटा यूजर्ससाठी उपलब्ध आहे. हे अ‍ॅपचे सर्वाधिक उपयोगी फीचर असेल. मात्र, मल्टी डिव्हाइस सपोर्ट आल्यानंतर सेवा बंद होणार का ? असा प्रश्न समोर आला आहे. यूजर्स याचा उपयोग कसा करू शकतील ? या सर्व प्रश्नांची उत्तरे च्या प्रवक्त्याने दिली आहे. वाचा: कसे काम करते WhatsApp चे मल्टी डिव्हाइस सपोर्ट फीचर ? मल्टी-डिव्हाइस सपोर्ट फीचरद्वारे यूजर्सला WhatsApp चा वापर इतर दुसऱ्या डिव्हाइसवर करण्याचा देखील पर्याय मिळतो. भलेही फोन इंटरनेट नेटवर्कशी कनेक्ट नसेल तरीही हे फीचर वापरता येईल. याआधी यूजर्सला WhatsApp Web अथवा विंडोज किंवा अ‍ॅप वापरण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करावा लागत असे. यासाठी अ‍ॅप इंटरनेटशी कनेक्ट असणे गरजेचे आहे. फोनमधील इंटरनेट डिस्कनेक्ट झाल्यानंतर डेस्कटॉप व्हर्जनवर येणारे मेसेज बंद होतात. मात्र, WhatsApp च्या नवीन फीचरमुळे हे सर्व बदलून जाईल. WhatsApp वेबचा उपयोग कसे कसा करता येईल? यूजर्स आता या नवीन फीचरद्वारे चार डिव्हाइसवर WhatsApp वापरू शकतील. त्यामुळे हे फीचर रोलआउट झाल्यानंतर WhatsApp Web चे काय होणार ? या प्रश्नाचे उत्तर देताना व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, ‘WhatsApp Web आमच्या यूजर्ससाठी एक महत्त्वपूर्ण प्लॅटफॉर्म आहे. आतापर्यंत WhatsApp एकावेळी एकाच डिव्हाइसवर उपलब्ध होते. डेस्कटॉप आणि वेब सपोर्ट केवळ फोनला मिरर करून काम करत असे. याचा अर्थ यासाठी फोन सुरू असणे गरजेचे आहे व इंटरनेट कनेक्शन देखील आवश्यक आहे.’ दरम्यान, लक्षात घेणे गरजेचे आहे की चार अतिरिक्त डिव्हाइसमध्ये WhatsApp Web, डेस्कटॉप आणि फेसबुक पोर्टलचा समावेश आहे. जर तुम्हाला अतिरिक्त डिव्हाइस स्वरूपात स्मार्टफोन अथवा टॅबमध्ये व्हॉट्सअ‍ॅप वापरायचे असेल तर थोडी वाट पाहावी लागेल. थोडक्यात, व्हॉट्सअ‍ॅप वेब आणि डेस्कटॉप अ‍ॅप नेहमी प्रमाणेच काम करत राहिल. तुमच्या स्मार्टफोन इंटरनेटशी कनेक्ट नसेल तरीही लॅपटॉप अथवा पीसीवरून मेसेज करता येईल. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fc9zth

Comments

clue frame