नवी दिल्लीः तुम्ही जर वोडाफोन आयडिया (Vodafone Idea) युजर असाल सावध होण्याची गरज आहे. वोडाफोन आयडिया ग्राहकांना सध्या एक नवीन फ्रॉड चांगलाच सतावत आहे. स्कॅमर्स यूजर्संचा डेटा चोरून फ्रॉड करीत आहे. नवीन एसएमएस घोटाळा संपूर्ण भारतातील (Vi) ग्राहकांसाठी होत आहे. नवीन स्कॅम मध्ये युजर्संना KYC व्हेरिफिकेशन करण्यासाठी सांगितले जात आहे. या मेसेज मध्ये स्पष्ट लिहिले आहे की, जर युजर्संनी केवायसी पूर्ण केली नाही तर २४ तासाच्या आत त्यांचा नंबर बंद होईल. जाणून घ्या या नवीन फ्रॉड संबंधी. वाचाः असा पसवला जात आहे फेक मेसेज हा मेसेज कंपनीकडून अधिकृत पणे पाठवला जात नाही. हा मेसेज स्कॅमर्स कडून पसरवला जात आहे. या मेसेज मुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. लोकांचा पर्सनल डेटा चोरून मोठा फ्रॉड केला जावू शकतो. वाचाः फेक मेसेज असा असेल प्रिय ग्राहक, तुमचा वोडाफोन सिम के वायसी केले नाही. e-KYC करण्यासाठी तुम्ही वोडाफोन हेल्पलाइन नंबर 786XXXXX वर तात्काळ कॉल करा. जर तुम्ही असे केले नाही तर तुमचा मोबाइल नंबर २४ तासाच्या आत बंद केला जाईल. जर तुम्ही फ्रॉड सोबत फसले गेले असाल तर तसेच तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल केला असल्यास तुमच्याकडे ईमेल आयडी, कॉन्टॅक्ट नंबर, अॅड्रेस, आधार डिटेल्स आणि एक फोटो मागितला जाईल. या डिटेल्सचा उपयोग अनेक घोटाळा करण्यासाठी केला जाईल. सोबत ऑनलाइन बँक खात्यातून तुमचे पैसेही काढले जावू शकते. वाचाः वोडाफोन आयडियाचा युजर्संना हा सल्ला मोबाइल युजर्संना कंपनीकडून सल्ला दिला आहे. यासारख्या मेसेजला रिप्लाय करू नका, असा सल्ला कंपनीकडून देण्यात आला आहे. टेलिकॉम ऑपरेटर कधीच तुमच्याकडे पर्सनल डिटेल्सची माहिती मागत नाही. जर कुणाला कोणतीही मदत हवी असेल तर त्यांनी कंपनीच्या अधिकृत स्टोरवर जावे. तसेच अधिकृत कस्टमर केयरच्या फोन नंबवर कॉल करावा, असे कंपनीने म्हटले आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rIRWGj
Comments
Post a Comment