नवी दिल्ली : मॅन्युफॅक्चरर कंपनी लवकरच आपली अपकमिंग स्मार्टफोन सीरिजला लाँच करणार आहे. कंपनी या सीरिजमध्ये नवीन मॉडेल Vivo X70 Pro+, आणि Vivo X70 ला सादर करणार आहे. हे फोन सप्टेंबरमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. रिपोर्टमध्ये आता फोनच्या किंमत आणि काही फीचर्सची माहिती समोर आली आहे. यामध्ये एफ/१.१५ अपर्चर कॅमेरा आहे, ज्यात फाइव्ह-अॅक्सिस इमेज स्टेबिलाइजेशन मिळते. Vivo X70 सीरिजमध्ये १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट डिस्प्ले मिळेल. वाचा: Vivo X70 Pro+, Vivo X70 Pro, Vivo X70 ची भारतात संभाव्य किंमत एका रिपोर्टनुसार, Vivo X70 Pro+ ची किंमत जवळपास ७० हजार रुपये, तर Vivo X70 Pro ची किंमत ५० हजार रुपये असू शकते. मात्र, Vivo X70 च्या किंमतीचा खुलासा करण्यात आलेला नाही. परंतु, इतर मॉडेलच्या किंमतीवरून याची किंमत ५० हजार रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने कथितपणे म्हटले आहे की, Vivo X70 सीरिज सप्टेंबरमध्ये लाँच होऊ शकते. याआधीच्या रिपोर्टमध्ये देखील अपकमिंग स्मार्टफोन सीरिज आयपीएल सीझन सुरू झाल्यावर लाँच होण्याची शक्यता व्यक्त केली होती. विवोने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. Vivo X70 Pro+, Vivo X70 Pro, Vivo X70 चे संभाव्य स्पेसिफिकेशन Vivo X70 मध्ये १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसोबत फुल एचडी+ डिस्प्ले मिळू शकतो, जे एक्स६० सीरिज समान असेल. सेल्फीसाठी यात पंच होल कटआउटची सुविधा मिळेल. विवोने आपल्या फ्लॅगशिप एक्स-सीरिजसाठी खास करून कॅमेऱ्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. या सीरिजमध्ये फाइव्ह-अॅक्सिस इमेज स्टेबिलायझेशनसोबत एफ/१.१५ अपर्चर कॅमेरा मिळू शकतो. लीक रिपोर्टनुसार, Vivo X70 Pro+ ला Vivo X60 Pro+ प्रमाणेच स्नॅपड्रॅगन ८८८ चिपसेटसोबत सादर केले जाईल. फोनमध्ये ६६ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएच बॅटरी मिळू शकते. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3igPunA
Comments
Post a Comment