नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्या आपल्या यूजर्ससाठी एक वर्ष वैधतेसह येणारे प्लान ऑफर करत आहेत. या प्लानमध्ये यूजर्सला डेटा-कॉलिंगसह अनेक फायदे मिळतात. तुम्ही जर एक वर्षाच्या वैधतेसह येणारा प्लान शोधत असाल तर वोडाफोन-आयडियाकडे दोन शानदार प्लान्स आहेत. यामध्ये यूजर्सला वर्षभरासाठी मोफत इंटरनेट, कॉलिंग आणि अन्य सुविधा मिळते. सोबतच, वीकेंड डेटा रोलओवर आणि चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळेल. वाचाः च्या या प्लान्सची किंमत २ हजार रुपयांपेक्षा अधिक आहे. यामध्ये Binge All Night ची सुविधा मिळते. म्हणजे रात्री १२ ते ६ अनलिमिटेड डेटा वापरू शकता. या प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. Vi चा २,३९९ रुपयांचा प्लान या प्लानची वैधता १ वर्ष आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १.५ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधा मिळते. तसेच, बिंज ऑल नाइट, वीकेंड डेटा रोलओवरची सुविधा मिळते. यामध्ये सोमवार ते शुक्रवार न वापरलेला डेटा शनिवार आणि रविवारी वापरू शकता. सोबतच ZEE5 आणि चा मोफत अॅक्सेस मिळेल. वाचाः Vi चा २५९५ रुपयांचा प्लान य प्लानमध्ये देखील यूजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १.५ जीबी आणि १०० एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानची वैधता १ वर्ष असून, यामध्ये Disney+ Hotstar vip आणि Vi movies and TV चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. याशिवाय बिंज ऑल नाइट आणि वीकेंड डेटा रोल ओवरची सुविधा दिली जात आहे. वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BS6UyG
Comments
Post a Comment