Vi रिचार्जवर ६० रुपयांपर्यंत कॅशबॅक, ऑफर ३१ जुलै २०२१ पर्यंत

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवीन रिचार्ज प्लान आणते. सोबत वेळोवेळी कॅशबॅक ऑफर सुद्धा आणत असते. दिग्गज टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडिया सुद्धा आपल्या ग्राहकांना कॅशबॅक सुविधा देत आहे. या ऑफर अंतर्गत Vi ग्राहकांना रिचार्ज केल्यास ६० रुपयांपर्यंत कॅशबॅक दिला जात आहे. ही ऑफर फक्त ३१ जुलै पर्यंत वैध आहे. कॅशबॅक कूपन रिचार्जसाठी एक आठवड्याच्या आत Vi App क्रेडिट केले जाईल. जाणून घ्या संपूर्ण ऑफर. वाचाः Vi रिचार्जवर ६० रुपयांचा कॅशबॅक कंपनी वेगवेगळी वैधता असलेल्या रिचार्जवर वेगवेगळी कॅशबॅक देत आहे. कॅशबॅकच्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना अनलिमिटेड प्लान निवडावा लागेल. कंपनीच्या वेबसाइट नुसार, २८ दिवसांचा अनलिमिटेड प्लान निवडल्यास २० रुपयांचा कॅशबॅक दिला जाईल. २८ दिवसांच्या वैधते सोबत कंपनीच्या १९९ रुपये, २१९ रुपये, २४९ रुपये, २९९ रुपये, ३९८ रुपये, ३०१ रुपये, ४०१ रुपये, ४०५ रुपयांचे प्लान येतात. वाचाः याच प्रमाणे ५६ दिवसांचा प्लान निवडल्यास ग्राहकांना ४० रुपयांचा कॅशबॅक दिला जातो. ५६ दिवसांची वैधता सोबत कंपनीचा ३९९ रुपये, ४४९ रुपये, ४९९ रुपये, ६०१ रुपये, ५९५ रुपये, ५५५ रुपये, ५५८ रुपयांचा प्लान येतो. ८४ दिवसांचा प्लान किंवा त्यापेक्षा जास्त वैधता असलेल्या अनलिमिटेड प्लानमध्ये ६० रुपयांचा कॅशबॅक दिला जातो. ८४ दिवसांचा किंवा त्यापेक्षा जास्त वैधता असलेल्या कंपनीचे ५९९ रुपये, ६९९ रुपये, ७९५ रुपये, ८०१ रुपये, ८१९ रुपये, ११९७ रुपये, २३९९ रुपये आणि २५९५ रुपये प्लानचा समावेश आहे. वाचाः कॅशबॅकच्या नियम व अटी कॅशबॅकला Vi अॅपवरून रिचार्ज केल्यानंतर रिडीम केले जावू शकते. २० रुपयाचे कूपन एक महिन्यासाठी वैधत असेल. याचा वापर २९९ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्जवर केला जाईल. याच प्रमाणे ४० रुपयाचे कूपन दोन महिन्यासाठी वैध असेल. याचा वापर ४४९ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्जवर केले जाईल. तर ६० रुपयांचे कूपन तीन महिन्यासाठी वैध असेल. याचा वापर ६९९ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्जवर होईल. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3f0Jg9e

Comments

clue frame