ठरलं ! Samsung Galaxy Z Series चे फोल्डेबल स्मार्टफोन्स ११ ऑगस्टला होणार लाँच, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली. कंपनी ११ ऑगस्ट रोजी Galaxy Z series लाँच करणार आहे. या मालिकेत कंपनी फोल्डेबल डिस्प्ले असलेले स्मार्टफोन्स बाजरात आणेल. ११ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या गॅलेक्सी अनपॅकडमध्ये कंपनी बर्‍याच नवीन घोषणा करण्याची अपेक्षा आहे . Samsung नुसार, झेड सीरिज फोल्डेबल स्मार्टफोनसह प्रथमच कंपनी एस पेन स्टाईलस प्रदान करेल. मात्र हे स्टाइलस फोल्डेबल असेल कि सामान्य ते येत्या काही दिवसातच कळेल. वाचा: सॅमसंगचे अध्यक्ष आणि मोबाईल कम्युनिकेशन्स बिझिनेस हेड डॉ. टीएम रोह यांनी म्हटले आहे की, ११ ऑगस्ट रोजी कंपनी गॅलेक्सी झेड मालिकेत नवीन स्मार्टफोन सादर करेल. त्यांनी असेही म्हटले की , तेथे काही आश्चर्य देखील आहेत. एस पेन त्यापैकीच एक. एस पेनला प्रथमच फोल्डेबल फोनसाठी डिझाइन केले गेले आहे. या दरम्यान , Galaxy Note मालिकेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. कारण, गॅलेक्सी नोट बाजारात आणण्याऐवजी, कंपनी आता फक्त गॅलेक्सी डिव्हाइसमध्ये नोट मालिकेचे वैशिष्ट्य देत आहे. अशात , कंपनी गॅलेक्सी नोट मालिका संपवित आहे की या वर्षी वगळत आहे हे यावरून स्पष्ट झाले नाही. सद्यस्थितीत कंपनीने याबाबत स्पष्टपणे काहीही सांगितले नाही. Samsung Galaxy Z मालिकेत फोल्डेबल स्मार्टफोनसाठी गुगल आणि मायक्रोसॉफ्टबरोबरही काम करत आहे. फोल्डेबल फोनमधील अ‍ॅप्सचे अधिक चांगले एकत्रिकरण हे त्याचे कारण आहे. फोल्डेबल फोनमध्ये गूगल ड्युओ व्हिडिओ कॉलिंग आणि यूट्यूबचा अनुभव चांगला असेल. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे Galaxy Z मालिकेचे फोल्डेबल स्मार्टफोन बरेच महाग आहेत. उदाहरणार्थ, भारतात Galaxy Z Fold 2 ची किंमत 1 लाख 34 हजार रुपये आहे. हे स्मार्टफोन प्रीमियम विभागातील आहेत. अशात , कंपनी फोल्डेबल फोनला मुख्य प्रवाहात आणू शकेल की नाही हे पाहणे नक्कीच उत्सुकतेचे ठरेल. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WuVgJT

Comments

clue frame