Realme Buds Q2 Neo चा आज भारतात पहिला सेल, १३०० रुपयांपेक्षा कमीमध्ये खरेदी करण्याची संधी, पाहा डिटेल्स
नवी दिल्ली. गेल्या आठवड्यात ट्रू वायरलेस स्टीरिओ (टीडब्ल्यूएस) इयरफोन लाँच करण्यात आले असून Realme Watch 2 Pro सारख्या अनेक प्रोडक्ट्स सह ते बाजारात दाखल करण्यात आले होते. आज भारतात Realme Buds Q2 Neo ट्रू वायरलेस स्टीरिओचा पाहिला सेल असून या सेलमध्ये ग्राहकांना हे Buds ऑफर्ससह खरेदी करण्याची संधी आहे. जाणून घ्या डिटेल्स. वाचा: भारतात Realme Buds Q2 Neo ची किंमत १,५९९ रुपये आहे. ग्राहक आज ते रीअलमीच्या अधिकृत वेबसाइट, फ्लिपकार्ट आणि काही निवडक लोकल स्टोअर्स मधून खरेदी करू शकतील. दुपारी १२ पासून हा सेल सुरू होईल. अर्ली बर्ड ऑफरअंतर्गत हे बड्स फ्लिपकार्टवर १,२९९ रुपयांत उपलब्ध करून देण्यात येतील. यात ब्लू आणि ब्लॅकचे दोन रंगांचे पर्याय आहेत. Realme Buds Q2 Neo : वैशिष्ट्ये हे एन्ट्री-लेव्हल ट्रू वायरलेस इअरबड्स असून ते इन-इयर डिझाइनसह सादर केले गेले आहे. या बड्समध्ये १० मिमी डायनॅमिक बास बूस्ट ड्राइव्हर्स देण्यात आले आहेत. अतिरिक्त बाससाठी,युजर्स रिअलमी लिंक अॅपद्वारे बास बूस्ट + पर्याय देखील निवडू शकतात. यात २० तासांपर्यंत बॅटरी बॅकअप आहे असा कंपनीचा दावा आहे. ४० एमएएच बॅटरी बड्सडमध्ये दिली आहे. तर चार्जिंग केसमध्ये ग्राहकांना ४०० mAh बॅटरी मिळेल. या डिव्हाइसमध्ये गेमिंग मोड देखील देण्यात आला आहे. कॉलसाठी Realme Buds Q2 Neo मध्ये पर्यावरणीय आवाज रद्द करण्याचे वैशिष्ट्य देण्यात आले आहे. यासह, केवळ १० मिनिटांच्या चार्जिंगवर हे डिव्हाईस १२० मिनिटे वापरता येते असा कंपनीचा दावा आहे. सोबतच, यात टच नियंत्रण देखील देण्यात आले आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2V3Kx8y
Comments
Post a Comment