लेटेस्ट फीचर्ससह Portronics Kronos Beta स्मार्टवॉच लाँच, युजर्स स्वतःच तयार करू शकणार वॉच फेस, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली. स्मार्टवॉचची आवड असणाऱ्यांकरिता एक नवीन पर्याय आता उपलब्ध आहे. ही सर्व वैशिष्ट्यांनी परिपूर्ण वॉच नुकतीच लाँच करण्यात आली असून या वॉचची किंमत ३,९९९ रुपये आहे. ब्लॅक, ग्रे आणि गुलाबी गुलाबी रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच मोठ्या ऑनलाइन पोर्टलवरुन हे घड्याळ खरेदी करता येईल. कंपनीच्या या लेटेस्ट स्मार्टवॉचमध्ये रिअल-टाइम हार्ट-रेट मॉनिटर, लाँग बॅटरी लाइफ सारखे फीचर्स आहे. वाचा: Portronics Kronos Beta : वैशिष्ट्ये या स्मार्टवॉचमध्ये १.२८ इंचाचा गोलाकार टीएफटी टच डिस्प्ले देण्यात आला असून Portronics Kronos Beta ५१२ MB इंटर्नल स्टोरेजसह येते. कंपनीचा दावा आहे की, या स्टोरेजमध्ये या घड्याळात ३०० पर्यंत गाणी सेव्ह केली जाऊ शकतात. युजर्सच्या आरोग्यासाठी आणि फिटनेस ट्रॅकिंगसाठी, या घड्याळामध्ये २४ x७ रिअल-टाइम हार्ट रेट मॉनिटरसह धावणे, चालणे आणि हायकिंगसारखे १० स्पोर्ट मोड्स देण्यात आले आहे. विशेष म्हणजे युएजर्सना हवे असल्यास, ते या घड्याळासह येणाऱ्या अॅपच्या मदतीने आपल्या आवडीचा वॉच फेस तयार करू शकतात. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ ५.१ आहे. Portronics Kronos Beta मध्ये २४० mAh बॅटरी देण्यात आली असून कंपनीचा असा दावा आहे की, ही बॅटरी एकाच चार्जींगवर सात दिवसांचा बॅकअप देते. स्मार्टवॉचमध्ये देण्यात आलेली ही बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी एक तास घेते. घड्याळाचे मुख्य भाग अॅल्युमिनियम आणि पॉली कार्बोनेटने बनलेले आहे. जे आयपी ६८ रेटिंगसह येते. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jfzSQz

Comments

clue frame