Paytm देत आहे नोकरीची संधी, ‘या’ पदासाठी भरणार २० हजार जागा

नवी दिल्ली : डिजिटल पेमेंट कंपनी देशभरात तब्बल २० हजार फील्ड सेल्स एग्झिक्यूटिव्हची भरती करणार आहे. कंपनी आपल्या आयपीओच्या आधी ही भरती करणार असून, प्रतिस्पर्धी कंपन्या आणि कडून मिळत असलेल्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. वाचा: नवीन भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना महिन्याला जवळपास ३५ हजार रुपये कमवण्याची संधी मिळेल. तसेच, त्यांना पेटीएमचे क्यूआर कोड, POS मशीन, पेटीएम साउंडबॉक्स या पोर्टफोलियोचा विस्तार करण्यासोबतच, वॉलेट, यूपीआय, पेटीएम पोस्टपेड, मर्चंट लोन्स आणि विम्यासंदर्भातील गोष्टींना प्रमोट करावे लागेल. पेटीएमच्या प्रवक्त्यांनी यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. कंपनीने काही दिवसांपूर्वीच फील्ड सेल्स एग्झिक्यूटिव्ह प्रोग्रामची सुरुवात केली असून, याचा उद्देश पदवीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगार देणे हा आहे. वाचा: दरम्यान, कंपनी ऑक्टोबरपर्यंत १६,६०० कोटी रुपयांचा आणण्याच्या तयारीत आहे. मे च्या आकडेवारीनुसार, यूपीआय ट्रांझॅक्शनमध्ये बाजारातील पेटीएमची हिस्सेदारी ११ टक्के आहे. तर फोन पे ची ४५ टक्के आणि गुगलची ३५ टक्के आहे. दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार, कंपनीचे मुल्य १६ बिलियन डॉलर्स आहे. तसेच, कंपनी ग्राहक आणि व्यापारासाठी आयपीओतील ४३०० कोटी रुपयांचा वापर करेल. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BTbQ6q

Comments

clue frame