OnePlus Nord 2 चा ओपन सेल भारतात सुरू, पाहा किंमत आणि फीचर्स

नवी दिल्लीः ला आता अॅमेझॉनवर सर्व युजर्संसाठी सेल मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. म्हणजेच आता फोनला ओपन सेल मध्ये ठेवण्यात आले आहे. या फोनला आता नॉन प्राइम मेंबर्स खरेदी करू शकतील. या फोनला गेल्या आठवड्यात लाँच करण्यात आले होते. याला अॅमेझॉन प्राइम डे सेल दरम्यान प्राइम मेंबर्स आणि वनप्लस रेड मेंबर्ससाठी उपलब्ध करण्यात आले होते. वाचाः OnePlus Nord 2 च्या ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी व्हेरियंटची किंमत २७ हजार ९९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २९ हजार ९९९ रुपये आहे. १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ३४ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. अता केवळ ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची विक्री सुरू आहे. ६ जीबी रॅमच्या फोनची विक्री ऑगस्ट मध्ये सुरू केली जाणार आहे. या फोनला ब्लू हेज आणि ग्रे सिएरा अशा दोन ऑप्शनमध्ये खरेदी करता येईल. या फोनवर एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शन आणि एचडीएफसी बँक डेबिट कार्ड ईएमआय ट्रान्झॅक्सनवर फ्लॅट १ हजार रुपयांचा इंस्टेंट डिस्काउंट मिळेल. वाचाः OnePlus Nord 2 फोनची विक्री कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून केली जात आहे. ग्राहकांना काही ऑफर्स दिले जात आहे. या फोनमध्ये ड्युअल नॅनो सिम सपोर्ट दिला आहे. यात ९० एचझेड रिफ्रेश रेट दिला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात ४५०० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3f4guVe

Comments

clue frame