धडाक्यात साजरा करा फ्रेंडशिप डे, OnePlus, Mi च्या 'या' स्मार्टफोन्सवर मिळतोय विशेष डिस्काउंट, पाहा ऑफर्स
नवी दिल्ली. उद्या १ ऑगस्ट, युवा वर्गाचा आवडता दिवड म्हणजेच फ्रेंडशिप डे. या निमित्ताने, अनेक दिग्गज स्मार्टफोन ब्रँड त्यांच्या काही उपकरणांवर चांगली सूट देत आहेत. OnePlus 9 Pro वर ३,००० इन्स्टंट डिस्काउंट उपलब्ध आहे, पण ही ऑफर केवळ HDFC बँक कार्ड पेमेंटवर आणि OnePlus.in, Amazon.in, रिटेल स्टोअर्सवर EMI व्यवहारांद्वारे उपलब्ध आहे. तर, अॅमेझॉन जुन्या फोनच्या एक्सचेंजवर १९,५५० रुपयांपर्यंत सूट देखील देत आहे. वाचा: या OnePlus स्मार्टफोनवर ऑफर्स उपलब्ध OnePlus 9R वर बँक ऑफर देखील उपलब्ध आहे. स्मार्टफोनची किंमत ४९,९९९ रुपये असून इच्छुक ग्राहक एक्सचेंजवर १७,५५० रुपयांपर्यंत सूट मिळवू शकतात. वनप्लसची अधिकृत वेबसाइट ५०,००० रुपयांपर्यंत एक्सचेंज प्रोग्राम चालवत असून अतिरिक्त एक्सचेंज बोनस देखील देत आहे. HDFC बँक कार्ड वापरून पेमेंट केल्यास तुम्हाला OnePlus 9R वर २,००० रुपयांची सूट देखील मिळेल. OnePlus Nord 2 खरेदी करायचा असल्यास यावर १,००० रुपयांची सूट तसेच नो-कॉस्ट ईएमआय ऑफरचा लाभ तुम्ही घेऊ शकता. वनप्लस.इन किंवा वनप्लस स्टोअर अॅपद्वारे हे मिड-रेंज फोन खरेदी करणारे युजर्स वनप्लस बँड १,४९९ रुपयांना मिळवण्यास पात्र असतील, असे कंपनीने म्हटले आहे. ही ऑफर ओपन सेलच्या तारखेपासून ३१ जुलै २०२१ पर्यंत वैध आहे, जी आज आहे. Xiaomi च्या या गॅझेटवर सूट Mi 11X 5G स्मार्टफोन २९,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध असून ही डिव्हाइसची जुनी किंमत आहे. पण शाओमी एसबीआय बँक क्रेडिट कार्डवर २,००० रुपयांची त्वरित सूट देत आहे. Mi Exchange सह, ग्राहकांना १३,००० रुपयांपर्यंत सूट देखील मिळते. Mi.com च्या नुसार , Xiaomi Mi 11X च्या खरेदीवर ६०,००० रुपयांपर्यंत मोफत टाइम्स प्राइम मेंबरशिप देखील असेल. फ्रेंडशिप डे निमित्त Xiaomi Redmi Note 10S स्मार्टफोनवर देखील सूट उपलब्ध आहे. Mi.com HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डसह १,००० रुपयांची त्वरित सूट उपलब्ध आहे. Mi एक्सचेंजसह तुम्हाला १०,००० रुपयांपर्यंत मिळतील. Xiaomi Mi Watch Revolve Active ७५० रुपयांपर्यंत सूट ऑफरसह लिस्ट असून हे HDFC बँक क्रेडिट कार्डवर लागू आहे. सध्या डिव्हाईस ९,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. अमेझॉनवर Mi Band 5 २,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध असून हे विअरेबल शाओमीच्या अधिकृत वेबसाइटवर २,४९९ रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आले आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xiZKjc
Comments
Post a Comment