Nokia ची धमाकेदार एन्ट्री ! ९००० रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच केला Nokia C30, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली. HMD Global ने C-Series चा हा नवीन स्मार्टफोन अधिकृतपणे लाँच केला आहे. कंपनीचे बजेट हँडसेट नोकिया सी-मालिकेत येतात. एचएमडी ग्लोबलच्या नवीन Nokia C30 मध्ये ६.८२ इंचाचा मोठा डिस्प्ले आणि ४ जी व्हीओएलटीई सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. जाणून घ्या डिटेल्स. वाचा : Nokia C30 किंमत आणि ऑफर Nokia C30 स्मार्टफोन ९९ युरो (सुमारे ८,६९० रुपये) मध्ये उपलब्ध करुन देण्यात आला आहे. काही निवडक बाजारात आजपासून हँडसेट खरेदी करता येईल. हा फोन ग्रीन आणि व्हाइट कलरमध्ये उपलब्ध असून भारतात फोनच्या उपलब्धतेविषयी अद्याप माहिती नाही. Nokia C30 : वैशिष्ट्य Nokia C30 मध्ये ६.८२ इंचाचा एचडी + डिस्प्ले आहे, ज्याचे रेझोल्यूशन १६०० x ७२० पिक्सेल आहे. स्क्रीनचा आस्पेक्ट रेशो २०: ९ आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. ज्याचा तपशील सध्या तरी उपलब्ध नाही. हा नोकिया फोन २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज, ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज आणि ३ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजसह येतो. मायक्रोएसडी कार्डद्वारे फोनची स्टोरेज वाढवता येऊ शकते. कॅमेर्‍याविषयी सांगायचे तर फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. एक २ मेगापिक्सलचा दुय्यम सेन्सर देखील आहे. सेल्फी आणि फ्रंटवर व्हिडिओ कॉलसाठी हँडसेटमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर देखील आहे. Nokia C30 स्मार्टफोनला शक्ती देण्यासाठी ६००० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे, जी १० डब्ल्यू चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन अँड्रॉइड ११ गो एडिशनसह आला आहे. या एंट्री-लेव्हल फोनसाठी अँड्रॉइड गो एडिशन विशेष सानुकूलित केले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी , डिव्हाइसमध्ये ४ जी व्होएलटीई, वाय-फाय ८०२.११ बी / जी / एन, ब्ल्यूटूथ ४.२, जीपीएस, ग्लोनास आणि मायक्रो-यूएसबी पोर्टची सुविधा देण्यात आली आहे. फोनच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3f0BKLn

Comments

clue frame