नवी दिल्ली. Noise Air Buds+ या मालिकेत यापूर्वी कंपनीने नॉइस एअर बड्स आणि नॉइस एअर बड्स मिनी देखील लाँच करण्यात आले होते. या नवीन डिव्हाइसमध्ये, युजर्सना ६ मिमी ड्रायव्हर्स, २० तासांपर्यंतची बॅटरी लाईफ आणि टाइप-सी चार्जिंग पोर्ट सारखी वैशिष्ट्ये दिसतील. Noise Air Buds+ ची किंमत १,९९९ रुपये असून हे डिव्हाईस ग्राहक पर्ल व्हाईट कलर ऑप्शनमध्ये ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉन वरून खरेदी करु शकतील. वाचा : Noise Air Buds+ ची वैशिष्ट्ये या डिव्हाइसमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.० चा सपोर्ट आहे. यासह, युजर्सना येथे एसबीसी आणि एएसी कोडेक्सचे समर्थन देखील मिळेल. एअर बड्स प्लसमध्ये ६ मिमी ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत. त्वरित कनेक्टसाठी या डिव्हाइसमध्ये स्मार्ट तंत्रज्ञान देखील प्रदान केले गेले आहे. हे इन-इयर स्टाईलचे इअरबड्स असून यात युजर्सना अदलाबदल करण्यायोग्य ईआरटीप्स देखील मिळतील. बॅटरी बद्दल सांगायचे तर, कंपनी दावा करते की एकाच चार्जींगमध्ये बड्स ४ तासांपर्यंत वापरता येतात. तसेच, चार्जिंग केसमध्ये २० तासांपर्यंतची बॅटरी उपलब्ध असेल. चार्जिंगसाठी युजर्सना डिव्हाइसच्या तळाशी टाइप-सी पोर्ट मिळेल. तसेच, येथे इंस्टा चार्ज तंत्रज्ञान देखील दिले गेले आहे. याच्या मदतीने तुम्ही बड्स केवळ ८ मिनिटांत डिव्हाइस चार्ज करू शकता आणि ८० मिनिटांसाठी ते वापरू शकता. परंतु, व्हॉल्यूम मात्र ७० % पर्यंत ठेवावा लागेल. डिव्हाईस पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे २ तासांचा वेळ लागतो. Noise Air Buds+ मध्ये टच कंट्रोल देखील देण्यात आले आहेत. याद्वारे युजर्स व्हॉल्यूम, कॉल आणि संगीत नियंत्रित करू शकतील . तसेच, सिरी आणि Google सहाय्यक वापरू शकतील. दोन्ही कॉलमध्ये मायक्रोफोन देखील देण्यात आले असून Noise Air Buds+ पाणी प्रतिकार करण्यासाठी IPX4 रेट केलेले आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BUUBBq
Comments
Post a Comment