नवी दिल्ली : ने अखेर आपल्या बहुप्रतिक्षित Edge 20 सीरिजवरून पडदा हटवला आहे. कंपनीने , Edge 20 आणि Edge 20 Lite स्मार्टफोन्सला सादर केले आहे. तिन्ही मॉडेल्समध्ये १०८ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोन्समध्ये दमदार स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहे. वाचाः Motorola Edge 20 Pro, Edge 20 आणि Edge 20 Lite: किंमत व उपलब्धता मोटोरोला एड्ज २० प्रो ला ६९९ यूरो (जवळपास ६१,७०० रुपये), एड्ज २० ला ४९९ यूरो (जवळपास ४४ हजार रुपये) आणि एड्ज २० लाइटला ३४९.९९ यूरो (जवळपास ३०,९०० रुपये) किंमतीत लाँच करण्यात आले आहे. या तिन्ही फोन्सची विक्री ऑगस्टपासून सुरू होईल. एड्ज २० प्रो डार्क ब्लू, व्हाइट आणि इंडिगो वीगन लेदर रंगात येतो. मोटोरोला एड्ज २० फ्रॉस्टेड ऑनिक्स आणि फ्रॉस्टेड पर्ल, तर एड्ज २० लाइट इलेक्ट्रिक ग्रेफाइट आणि ग्रीन रंगात येईल. Motorola Edge 20 Pro, Motorola Edge 20: स्पेसिफिकेशन्स मोटोरोला एड्ज २० प्रो या सीरिजमधील प्रीमियम फोन आहे. यामध्ये ६.६७ इंच १० बिट ओलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो Amazon एचडीआर, एचडीआर१०+ सपोर्ट करतो. स्क्रीनचा रिफ्रेश रेट १४४ हर्ट्ज आहे. फोनमध्ये फ्रंट कॅमेऱ्यासाटी डिस्प्लेमध्ये पंच-होल देण्यात आला आहे. एड्ज २० मध्ये देखील हेच फीचर्स मिळतात. मात्र, याचा डिस्प्ले Amazon HDR सपोर्ट करत नाही. मोटोरोला एड्ज २० प्रो मध्ये स्नॅपड्रॅगन ८७० प्रोसेसर देण्यात आले आहे. फोनमध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इनबिल्ड स्टोरेज मिळते. यात टर्बो राइट आणि होस्ट अवेअर परफॉर्मेस बूस्टर फीचर्स आहे. तर एड्ज २० स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७७८जी प्रोसेसर, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळते. मात्र, फास्ट राइटिंग स्पीड आणि परफॉर्मेंस बूस्टर सारखे फीचर्स नाहीत. आणि एड्ज 20 मध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो. एड्ज २० प्रो मध्ये ५एक्स ऑप्टिकल झूम आणि ५०एक्स सुपरझूमसह ८ मेगापिक्सल पेरिस्कोप कॅमेरा आणि १६ मेगापिक्सल अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. प्रो मॉडेलने ८के शूटिंग करू शकता. मोटोरोला एड्ज २० मध्ये ३एक्स ऑप्टिकल झूम आणि ३०x सुपरझूमसह ८ मेगापिक्सल आणि १६ मेगापिक्सल अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा मिळतो. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. मोटोरोला एड्ज २० प्रो मध्ये ४५०० एमएएच बॅटरी, एड्ज २० मध्ये ४००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. दोन्ही फोन्स ३० वॉट टर्बोपॉवर फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. दोन्ही हँडसेट्स अँड्राइड ११ सह My UX स्किन सपोर्ट मिळतो. Motorola Edge 20 Lite: स्पेसिफिकेशन्स मोटोरोला एड्ज २० लाइटमध्ये ६.६७ इंच १०-बिट ओलेड डिस्प्ले आहे, जो एचडीआर १०+ सपोर्ट करतो. स्क्रीनचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी प्रोसेसर देण्यात आला आहे. यात ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळते. हँडसेटमध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा आणि २ मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा आहे. फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट सेंसर मिळतो. मोटोरोला एड्ज २० प्रो आणि एड्ज २०मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. फोन वॉटर-रेसिस्टेंस, थिंकशील्ड सिक्योरिटी आणि वाय-फाय ६ सारखे फीचर्स मिळतात. मोटोरोला एड्ज २० लाइटमध्ये ३० वॉट टर्बोपॉवर फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळते. फोनमध्ये अँड्राइड ११ सह My UX सपोर्ट मिळतो. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fbqA6Q
Comments
Post a Comment