दीड लाखाचा Moto Razr फोल्डेबल स्मार्टफोन निम्म्या किंमतीत खरेदीची संधी, पाहा 'ही' भन्नाट ऑफर

नवी दिल्ली : मोटोरोलाचा मोटो रेझरला खूपच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. हा स्मार्टफोन सेलमध्ये उपलब्ध आहे. या डिव्हाइसवर बंपर डिस्काउंटपासून ते एक्सचेंज ऑफर मिळत आहे. फोनमध्ये दोन स्क्रीन देण्यात आल्या आहेत. यात पहिला डिस्प्ले ६.२ इंच आणि दुसरा २.७ इंच आहे. याशिवाय फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७१० प्रोसेसर आणि २५१०एमएएचची बॅटरी मिळते. वाचाः ची किंमत आणि ऑफर स्मार्टफोनची मूळ किंमत १,४९,९९९ रुपये आहे. मात्र फ्लिपकार्टवर केवळ ५४,९९९ रुपयात खरेदी करू शकता. या फोनवर आयसीआयसीआय बँकेकडून १० टक्के डिस्काउंट दिले जात आहे. यासोबतच, Axis बँकेकडून ५ टक्के कॅशबॅक मिळेल. स्मार्टफोनवर १९,२५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील मिळते. तसेच, १,८८० रुपये प्रति महिना नो-कॉस्टचा देखील पर्याय आहे. Moto Razr चे स्पेसिफिकेशन फोल्डेबल फोन Moto Razr मध्ये ६.३ इंच ओएलईडी एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिझॉल्यूशन ८७६x२१४२ पिक्सल आहे. तर याची स्क्रीन फोल्ड झाल्यानंतर २.७ इंच होते. यामध्ये स्क्रीनच्या सुरक्षेसाठी ३डी गोरिल्ला ग्लास ३ चा सपोर्ट देण्यात आलेला आहे. डिव्हाइस क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७१० प्रोसेसरसह येतो. वाचाः कॅमेरा या फोनमध्ये ड्यूल एलईडी फ्लॅश लाइटसह १६ मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर मिळेल. याचा अपर्चर एफ/१.७ आहे. याशिवाय फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी Moto Razr स्मार्टफोनमध्ये २५१० एमएएचची बॅटरी दिली आहे. फोनसोबत १८ वॉटचा टर्बोपॉवरचा चार्जर मिळतो. कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ, वाय-फाय जीपीएस, ई-सिम आणि यूएसबी पोर्ट सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतील. याशिवाय यात फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉक सारखे फीचर्स देखील मिळतात. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zAMuYW

Comments

clue frame